अभिनेता धर्मेंद्र हे बॉलिवूड सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहेत. ७०-८०च्या दशकात अॅक्शनस्टार म्हणून नावलौकीक मिळवणारे धर्मेंद्र ‘सुपर स्टार सिंगर’ या रिअॅलिटी शोमध्ये आले होते. त्यांच्याबरोबरच आभिनेत्री आशा पारेख या देखील हजर होत्या. या शोमध्ये दोघांनीही आपल्या अभिनय कारकिर्दीत घडलेल्या आठवणींना उजाळा दिला.
या शोमध्ये आशा पारेख यांनी १९६६ साली प्रदर्शित झालेल्या ‘आए दिन बहार के’ या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान घडलेला एक गमतीदार किस्सा सांगितला. या चित्रपटाचे चित्रिकरण दार्जिलींगमध्ये सुरु होते. त्यावेळी दिवसभराचे काम पूर्ण झाल्यानंतर सर्व कलाकार रात्री जोरदार पार्टी करत असत. या पार्टीत धर्मेंद्र भरपूर दारु पित आणि सकाळी चित्रिकरणादरम्यान दारुचा वास येऊ नये म्हणून ते कांदा खात असत. परंतु मला कांद्याचा वास आवडत नाही, त्यामुळे मी दिग्दर्शकांकडे धर्मेंद्र यांची तक्रार करत असे. हा गमतीदार किस्सा आशा पारेख यांनी सांगितला.
हा किस्सा ऐकून धर्मेंद्र जोर जोराने हसू लागले त्यानंतर त्यांनी बहुदा आशा पारेख यांना दारुचाच वास आवड असावा त्यामुळेच कांदा खाल्याबद्दल त्या दिग्दर्शकांकडे माझी तक्रार करत असाव्या अशा मिष्कील शब्दात त्यांनी आशा पारेख यांना प्रतिक्रीया दिली.