गलती से मिस्टेक? विवेकने मोदींसाठी केले ट्विट, सलमानच्या सिनेमाचे झाले प्रमोशन

विवेकने मोदींना शुभेच्छा देण्यासाठी केले ट्विट अन्…

vivek and salman
विवेक ओबेरॉय, सलमान खान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीत नेत्रदीपक विजय संपादन केला. या विजयाबद्दल सर्वच स्तरांतून मोदींवर शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला. ‘पीएम नरेंद्र मोदी’ या बायोपिकमध्ये मोदींची भूमिका साकारणाऱ्या विवेक ओबेरॉयनेही ट्विट करत मोदींना शुभेच्छा दिल्या आणि उपरोधिकरित्या विरोधकांना टोला लगावला. विशेष म्हणजे, विवेकने या ट्विटमध्ये अप्रत्यक्षरित्या अभिनेता सलमान खानच्या आगामी सिनेमाचं प्रमोशन केलं आहे.

‘मोदींचा तिरस्कार करणाऱ्यांसाठी विनंती आहे की त्यांचा द्वेष कमी करा आणि ‘भारत’वर अधिक प्रेम करा. सुदृढ लोकशाहीसाठी देशाला समंजस विरोधी पक्षाची गरज आहे,’ असं ट्विट विवेकने केलं आहे. या ट्विटमध्ये त्याने ‘भारत’ असा उल्लेख केला आहे आणि सलमानच्या आगामी सिनेमाचं नावदेखील ‘भारत’ आहे. त्यामुळे विवेकने अप्रत्यक्षरित्या त्याच्या सिनेमाचं प्रमोशनच केलंय असं नेटकऱ्यांनी म्हटलंय.

एग्झिट पोल जाहीर झाल्यानंतर विवेकने ऐश्वर्या आणि सलमानचा मीम शेअर केला होता. या मीमवरून चांगलाच वाद रंगला होता. अखेर विवेकने तो मीम डिलीट करत माफीदेखील मागितली. यावर सलमानची प्रतिक्रिया विचारली असता ‘मी काम करू की कमेंट्स पाहू,’ असं तो म्हणाला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Did vivek oberoi just end up promoting salman khan bharat in his tweet