बॉलिवूड चित्रपट निर्माता करण जोहरच्या बिग बॉस ओटीटी या शोमुळे चर्चेत आलेली अभिनेत्री म्हणजे उर्फी जावेद. ती तिच्या अतरंगी फॅशनमुळे नेहमीच सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरते. अनेकदा तिला तिच्या कपड्यांमुळे सोशल मीडियावर ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. आता उर्फीने नवे फोटोशूट केले असून सोशल मीडियावर चर्चेत आहे. तिला या फोटोवरुन ट्रोल केले जात आहे.

उर्फीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिने गुलाबी रंगाची ब्रालेट परिधान केली असून खाकी रंगची पँट घातली आहे. पण उर्फीने पँटचे बटण मात्र लावलेले नाही. त्यावरुन तिला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.
आणखी वाचा : माझी एक्स गर्लफ्रेंड भांडण झाल्यावर…; रणबीर कपूरचा धक्कादायक खुलासा

switching your exercise routine have several benefits
काही ठराविक महिन्यानंतर व्यायामामध्ये बदल करणे आवश्यक आहे? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
how eating onions included food in summer helps to beat the heatwaves
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी कांदा कसा ठरतो फायदेशीर; जाणून घ्या उन्हाळ्यात कांदा खाण्याचे फायदे
Why did Lawrence Bishnoi gang fire outside Salman Khans house What is the extent of this gang
लॉरेन्स बिष्णोई टोळीने सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार का केला? या टोळीची व्याप्ती किती? पुन्हा हल्ला करण्याची धमकी किती गंभीर?
The crime branch police demanded a bribe of 10 lakhs crime news
गुन्हे शाखेच्या पोलिसाने मागितली १० लाखांची लाच; काशिमिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

एका यूजरने ‘पँटचे बटण तर लाव’ असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने ‘तुझ्या पप्पाची पँट आहे का?’ असे म्हणत उर्फीला ट्रोल केले आहे. तर तिसऱ्या एका यूजरने ‘तू खूप छान दिसते’ असे म्हटले आहे.

उर्फीचा प्रत्येक लूक हा चर्चेचा विषय ठरतो. काही दिवसांपूर्वी उर्फीने घातलेल्या टीशर्टची चर्चा रंगली होती. त्या टीशर्टवर ‘मी जावेद अख्तर यांची नात नाही’ असे लिहिले होते. तसेच तिच्या हातात भगवद् गीता होती. त्यानंतर आता उर्फी पुन्हा चर्चेत आहे.