प्रेक्षकांना हसविणे कठीण – विनोदवीर कपिल शर्मा

प्रेक्षकांना हसवणे सोपे नसून हा एक कठीण व्यवसाय असल्याचे खुद्द रिअॅलिटी शो विजेता विनोदवीर कपील शर्मा म्हणाला. मनोरंजनाच्या नवनवीन कल्पना आणणे, हे एक आव्हान आहे. विनोद काळानुसार विकसित होत असून त्याला पोशाख, संवाद आणि हावभाव हे घटकही जोडले गेले आहेत. ‘

प्रेक्षकांना हसवणे सोपे नसून हा एक कठीण व्यवसाय असल्याचे खुद्द रिअॅलिटी शो विजेता विनोदवीर कपील शर्मा म्हणाला. मनोरंजनाच्या नवनवीन कल्पना आणणे, हे एक आव्हान आहे. विनोद काळानुसार विकसित होत असून त्याला पोशाख, संवाद आणि हावभाव हे घटकही जोडले गेले आहेत. ‘पा’ चित्रपटात अमिताभ बच्चन यांची जर विनोदी बाजू दाखविण्यात आली नसती तर हा अभिनय पाहण्यास कंटाळवाणा वाटला असता, असेही कपिल म्हणाला. हा विनोदवीर ‘ कॉमेडी नाइट विथ कपिल’ या विनोदी शोमधून आजपासून (शनिवार) कलर्स वाहिनीवर प्रेक्षकांना दिसणार आहे. कपिल व्यतिरिक्त या १३ भागांच्या शोमध्ये इतर विनोदी कलाकारसुद्धा काम करणार आहेत. या शोमध्ये काही सेलिब्रिटी येणार असून पहिल्या भागात धमेंद्र, विद्या बालन आणि इमरान हाश्मी हे पाहुणे कलाकार म्हणून उपस्थित राहणार आहेत. सदर शोची खास गोष्ट म्हणजे येथे कोणतेही दुहेरी अर्थाचे विनोद असणार नाहीत. त्यामुळे संपूर्ण कुटुंब एकत्रितपणे हा शो पाहू शकणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Difficult to make people laugh says comedian kapil sharma

ताज्या बातम्या