टीव्हीवरील काही मालिका अशा असतात ज्या प्रेक्षकांना कायम लक्षात राहतात. त्या मालिकेमधील पात्र, डायलॉग मालिका संपल्यानंतरही अनेकांच्या तोंडून ऐकायला मिळातात. अशीच झी मराठी वाहिनीवरील एक मालिका म्हणजे ‘दिल दोस्ती दुनियादारी.’ या मालिकेतील प्रत्येक पात्र आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. पण नुकताच या मालिकेतील एका अभिनेत्रीचा साखरपुडा झाला आहे.
‘दिल दोस्ती दुनियादारी’ मालिकेतील सतत गोंधळलेले पात्र म्हणजे अॅना उर्फ पूजा ठोंबरे. पूजाने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर साखरपुड्याचा फोटो शेअर केला आहे. पूजाने १४ डिसेंबर रोजी कुणाल अहिररावसोबत साखरपुडा केला. तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटकवर साखरपुड्याचा फोटो शेअर करत आरती वडगबाळकरचे आभार मानले आहेत.
पूजाने तिच्या साखरपूड्याचा सोहळा अतिशय खासगी पद्धतीने आयोजित केला होता. तिने जवळच्या मित्रमैत्रीणींना आणि कुटुंबीयांना आमंत्रण दिले होते. तिने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंनंतर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. आता पूजा लग्नबंधनात केव्हा अडकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.