गाण्याच्या माध्यमातून ब-याच गोष्टींचा चांगला आणि प्रभावी प्रसार होतो अशा कृतीच्या वाढत्या प्रमाणात आता ‘दिल की धडकन’ या देण्याची भर पडत आहे.  हृदयाची धडधड वाढवणा-या मुबईकरांच्या जीवनशैलीत काही सकारात्मक बदल करावेत, इतकी धावाधाव गरजेची नाही‌, कमी वयातच हृदयाशी संबंधित आजार लावून घेवू नयेत हे या गीताच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न आहे.
येत्या २९ सप्टेंबर रोजी असलेल्‍या जागतिक हृदय दिनाच्या निमित्ताने फोर्टिस, हेल्थकेअर लिमिटेड या संस्थेच्या वतीने या गीताची निर्मिती करण्यात आली आहे. गायक, संगीतकार, गिटार वादक लेस्ली लुईस यानी हे विशेष गीत तयार केले आहे. २९ सप्टेंबरला एमएमआरडीए मैदानात होणा-या कार्यक्रमात हे गाणे सादर होईल.
या गीतासंदर्भात लेस्ली लुईस सांगतो, संगीत आणि हृदय यांचे नाते चिरंतन आहे, युवकाना त्यांच्या हृदयाची काळजी घ्यायला लावणा-या गाण्याची रचना करायला मिळाल्यने मी आनंदीत आहे.