‘तुझी एकूण किती संपती आहे?’, दिलजीतने चाहत्याला दिले मजेशीर उत्तर, म्हणाला…

दिलजीतने Ask Me Anything द्वारे चाहत्यांशी संवाद साधला.

diljit dosanjh, diljit dosanjh instagram,
दिलजीतने Ask Me Anything द्वारे चाहत्यांशी संवाद साधला.

बॉलिवूड अभिनेता आणि गायक दिलजीत दोसांज सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तो चाहत्यांच्या संपर्कात राहतो. दिलजीतने सोशल मीडियावरील ‘Ask Me Anything’ द्वारे चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी नेटकऱ्यांने दिलजीतला संपत्तीपासून डिनर डेटपपर्यंत अनेक गोष्टींविषयी विचारले.

दिलजीतने इन्स्टाग्रामवरील ‘Ask Me Anything’ द्वारे चाहत्यांशी संवाद साधला होता. या वेळी एका नेटकऱ्याने त्याला त्याच्या संपत्ती विषयी प्रश्न विचारला होता. ‘सध्या माझ्या आत जे काही सुरु आहे तिच माझी संपत्ती आहे, असे उत्तर दिलजीतने त्या नेटकऱ्याला दिले. तर दुसऱ्या  नेटकऱ्यांने विचारलं की ‘तुझ्याकडे कोणत्या गाड्या आहेत? तर त्यावर दिलजीत म्हणाला,’ माझ्याकडे कोणतीच गाडी नाही.’

diljit dosanjh, diljit dosanjh instagram,
दिलजीतने Ask Me Anything द्वारे चाहत्यांशी संवाद साधला.

तिसरा नेटकरी म्हणाला, ‘माझं दिलजीतसोबत डिनर डेटवर जाण्याचं स्वप्न आहे.’ त्याला उत्तर देत दिलजीत म्हणाला, ‘सकाळचा नाष्टा चालेल का? कारण दिवसभरातील माझं सगळ्यात आवडतं जेवण तेच आहे.’ तर एक नेटकरी म्हणाला, ‘अभिनय आणि गायन यातलं काय निवडणार?’ दिलजीत म्हणाला, ‘१०० टक्के गायन कारण त्यात जादू आहे’, अनेक प्रश्न दिलजीतला विचारण्यात आले होते.

आणखी वाचा : ‘रितेश ८ वेळा माझ्या पाया पडला होता’; जेनेलियाने सांगितला लग्नातील किस्सा

diljit dosanjh, diljit dosanjh instagram,
दिलजीतने Ask Me Anything द्वारे चाहत्यांशी संवाद साधला.

आणखी वाचा : याला म्हणतात खरं प्रेम! विक्रम बत्रा यांची प्रेयसी आजही आहे अविवाहीत

दरम्यान, दिलजीतचा ‘सूरज पे मंगल भारी’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट प्रदर्शित होताच चाहत्यांच्या पसंतीस उतरला होता. या चित्रपटात दिलजीत दोसांजसोबत मनोज वाजपेयी आणि फातिमा सना शेख महत्वाच्या भूमिकेत आहेत. सुप्रिया पिळगावकर, मनोज पाहवा, सीमा पाहवा, अन्नू कपूर आणि विजय राज या कलाकार मंडळींनी महत्त्वपूर्ण भूमिका वठवली आहे.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Diljit dosanjh interacts with fans on instagram answers question about his net worth dcp

ताज्या बातम्या