‘टूकूर टूकूर..देख टकाटक’, ‘दिलवाले’ चित्रपटातील नवे गाणे प्रदर्शित

फिकट रंगाच्या सेटवर गडद रंगाच्या स्पोट्सकार अशा लक्षवेधी सेटवर या गाण्याचे चित्रीकरण करण्यात आले आहे.

'टूकूर टूकूर..देख टकाटक' असे बोल असणाऱया या नव्या गाण्यात शाहरुख-काजोल आणि वरुण धवन-क्रीती सनोन धम्माल करताना दिसतात

‘गेरूआ’ गाण्याला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर आता ‘दिलवाले’ चित्रपटातील आणखी एक गाणे प्रदर्शित झाले आहे. ‘टूकूर टूकूर..देख टकाटक’ असे बोल असणाऱया या नव्या गाण्यात शाहरुख-काजोल आणि वरुण धवन-क्रीती सनोन धम्माल करताना दिसतात. फिकट रंगाच्या सेटवर गडद रंगाच्या स्पोट्सकार अशा लक्षवेधी सेटवर या गाण्याचे चित्रीकरण करण्यात आले आहे. काजोल आणि क्रिती गाण्यात गुलाबी व निळ्या रंगाच्या साडीत दिसून येतात, तर वरुण आणि शाहरुखनेही एकमेकांना साजेसा गडद रंगाच्या वेशभूषेला प्राधान्य दिले आहे.
दिग्दर्शक रोहित शेट्टीचा दिलवाले हा चित्रपट येत्या १८ डिसेंबरला प्रदर्शित होत असून, त्याच दिवशी दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांचा बहुचर्चित बाजीराव-मस्तानी देखील प्रदर्शित होणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Dilwale srk kajol kriti varun match outfits and steps in tukur tukur song

ताज्या बातम्या