मराठीतील दिग्गज दिग्दर्शकांपैकी एक नाव म्हणजे दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde). केदार शिंदे हे महाराष्ट्रातील घराघरात ओळखले जाणारे नाव आहे. शाहीर साबळे हे केदार यांचे आजोबा आहेत. आजोबांचा वसा सांभाळत केदार शिंदे यांनी मराठी नाट्यभूमी, मालिका विश्व आणि सिनेमा क्षेत्र अशा तिन्ही माध्यमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. दिग्दर्शक केदार शिंदे कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे (Shahir Sable) यांच्या आयुष्यावर आधारित एक चित्रपट घेऊन येणार आहेत. या चित्रपटाचे नावं ‘महाराष्ट्र शाहीर’ (Maharashtra Shahir) असे आहे. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या (MNS Raj Thackeray) उपस्थितीत या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. आता राज ठाकरेंसाठी केदार शिंदेंनी एक खास पोस्ट शेअर केली आहे.

केदार शिंदे यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये महाराष्ट्र शाहीर या त्यांच्या आगामी चित्रपटाचा पोस्टर आणि राज ठाकरे दिसत आहेत. राज ठाकरे त्या पोस्टरकडे निरखून पाहत आहेत. हा फोटो शेअर करत केदार शिंदे म्हणाले, “आपल्या कलाकृतीकडे पाहणारा एक अव्वल कलाकार… मनस्वी आनंद”. त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

आणखी वाचा : नवरीने नवरदेवाला पाण्यात धक्का देण्याच्या प्रयत्नात घडले असे काही, पाहा व्हिडीओ

आणखी वाचा : मुनव्वरला धर्माच्या आधारावर टार्गेट केल्याचा आरोपावर पायल रोहतगी, म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केदार शिंदे दिग्दर्शित, केदार शिंदे प्रॉडक्शन्स प्रस्तुत व बेला केदार शिंदे निर्मित ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटात शाहिरांच्या मुख्य भूमिकेत अंकुश चौधरी (Ankush Chaudhari) झळकणार आहे. या चित्रपटाची पटकथा व संवाद प्रतिमा कुलकर्णी यांनी लिहिले आहेत. या चित्रपटातील संगीत महाराष्ट्राचे लाडके गायक अजय- अतुल यांनी दिले आहे. हा चित्रपट २८ एप्रिल २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची घोषणा महाराष्ट्र दिनाच्या शुभमुहूर्तावर करण्यात आली होती.