बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी इन्स्टाग्रामवर फार सक्रीय असते. अल्पावधीतच दिशाने आपल्या सौंदर्याने बॉलिवूडमध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. सध्या दिशा एका वेगळ्याच कारणासाठी सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. दिशाची तुलना आता हॉलिवूड अभिनेत्री पेनेलोप क्रूजशी होऊ लागली आहे. प्रसिद्ध स्पॅनिश अभिनेत्री पेनेलोप क्रूज आणि दिशा पटानीच्या दिसण्यामध्ये साम्य असल्याचे नेटीझन्सचे म्हणणे आहे. इतकंच नाही तर दिशा पटानी ही भारतीय पेनेलोप क्रूज असल्याचेही सोशल मीडियावर म्हटले जात आहे.

केवळ दिशाचे चाहतेच तिला पेनेलोप क्रूज म्हणतात असं नाही तर स्वत: दिशालासुद्धा हेच वाटत असल्याचं समोर येत आहे. पेनेलोपचा एक फोटो दिशाने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यामुळे कदाचित दिशा पेनेलोपला आपला आदर्श मानत आहे असं म्हणायला हरकत नाही. दिशाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केलेल्या फोटोंची तुलना केल्यास तुम्हालाही पेनेलोप क्रूजची नक्कीच आठवण येईल.

अक्षयचा ‘टॉयलेट: एक प्रेम कथा’ अडकला कॉपीराइटच्या वादात

२०१५ मध्ये आलेल्या कॅडबरीच्या जाहिरातीमध्ये दिशा पहिल्यांदा दिसली होती. त्यानंतर २०१६ मध्ये ‘लोफर’ या तेलगू सिनेमातून तिने सिनेसृष्टीत प्रवेश केला. तिने आतापर्यंत एकूण चार सिनेमांत काम केले आहे. त्यातला ‘एमएस धोनी अनटोल्ड स्टोरी’ हा सिनेमा सुपरहिट ठरला होता. तिने जॅकी चॅनसोबत ‘कुंग फू योगा’ या आंतरराष्ट्रीय सिनेमातही काम केलं आहे. याशिवाय तिचं नाव टायगर श्रॉफसोबतही अनेकदा जोडलं जातं. पण तिने याबाबत कोणतेही वक्तव्य केलेले नाही. एवढेच काय तर टायगरनेही ते दोघं फक्त जवळचे मित्र असल्याचे वारंवार सांगितले आहे.

वाचा : सारावर का आली तोंड लपवण्याची वेळ?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या दिशा पटानी करण जोहरच्या ‘स्टुडन्ट ऑफ द इयर’ चित्रपटाच्या सिक्वलमध्ये टायगर श्रॉफसोबत स्क्रिन शेअर करणार असल्याच्या चर्चा रंगताना दिसत आहेत. चित्रपटाच्या निर्मात्यांनी याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. लवकरच दिशा पुन्हा एकदा सुशांत सिंग राजपूतसोबत ‘रॉ’ या सिनेमात काम करणार असे म्हटले जाते. टायगरही लवकरच ‘मुन्ना मायकल’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नृत्यकौशल्य आणि भारदस्त शरीरयष्टीमुळे बॉलिवूडमध्ये वेगळी ओळख निर्माण करणारा टायगर या सिनेमात ‘डान्स’ आणि ‘अॅक्शन’ची उत्तम सांगड घालताना दिसणार आहे.