बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री दिशा पटानी तिच्या अभिनयासोबतच फॅशन सेन्स आणि बॉल्ड लूकमुळे कायम चर्चेत असते. दिशा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचे दिसते. फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत दिशा चाहत्यांच्या संपर्कात राहते. आता दिशाने शेअर केलेल्या फोटोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सतत बोल्ड लूकमुळे चर्चेत असणाऱ्या दिशाने लहेंगा परिधान करुन फोटो शेअर केला आहे. तिचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्पॉटबॉयने दिलेल्या वृत्तानुसार, दिशा ‘एक व्हिलन २’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात सध्या व्यग्र आहे. परंतू त्यातून वेळ काढत दिशा लहाणपणीच्या मित्राच्या लग्नात हजेरी लावण्यासाठी उदयपूरला पोहोचली आहे. दिशाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत दिशाने सोनेरी रंगाच ब्लाऊज आणि हिरव्या रंगाचा लहेंगा परिधान केल्याचे दिसत आहे. या लूकमध्ये दिशा सुंदर दिसत आहे.

“केस आणि मेकअप मी स्वत: केला” असे कॅप्शन दिशाने त्या फोटोला दिले आहे. दिशाचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या फोटोला १८ लाख पेक्षा जास्त लोकांनी लाइक केले आहे.

दिशा लवकरच बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या ‘राधे’ या चित्रपटात दिसणार आहे. त्यासोबतच दिशा ‘एक व्हिलन २’ या चित्रपटात देखील दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मोहित सुरी करत आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Disha patani shared a photo of her in traditional dress went viral dcp 98 avb
First published on: 19-02-2021 at 14:07 IST