‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेतून नावारुपास आलेली अभिनेत्री दिशा वकानी उर्फ दया बेन मालिकेत पुन्हा कधी परतणार? हा प्रश्न चाहते सातत्याने विचारत आहेत. लग्नाच्या निमित्ताने मालिकेतून ब्रेक घेणारी दिशा अडिच वर्षानंतरही परतलेली नाही. नुकतेच ‘तारक मेहता’ मालिकेने ३००० भागांचा टप्पा ओलांडला. या निमित्ताने दिशाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर मालिकेतील काही फोटो पोस्ट केले होते. हे फोटो पाहून काही चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे. असे फोटो दाखवून आमच्या भावनांशी खेळू नकोस? अशी सक्त ताकिद त्यांनी दिशाला दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अवश्य पाहा – होऊ दे खर्च! १० मिनिटांच्या शॉर्ट फिल्मसाठी अभिनेत्रीने घातला ३७ कोटींचा ड्रेस

नेमकं प्रकरण काय आहे?

दया बेन ही ‘तारक मेहता’ मालिकेतील मुख्य व्यक्तिरेखा आहे. मालिकेतील अनेक प्रसंग या व्यक्तिरेखेभोवती फिरताना आपण पाहिले आहेत. शिवाय आपल्या अनोख्या अभिनय शैलीतून दिशाने या भूमिकेला प्रचंड लोकप्रिय केलं. मात्र यापुढे आता ही व्यक्तिरेखा मालिकेत पुन्हा कधी पाहायला मिळणार का? असा प्रश्न चाहत्यांना सतावतोय. मालिकेतील प्रत्येक कलाकाराला हा प्रश्न वारंवार विचारला जातो. मात्र अद्याप कोणीही याचं ठाम असं उत्तर दिलेलं नाही. परिणामी मालिकेचे काही चाहते प्रचंड संतापले आहेत. त्यातच दिशा गेल्या काही दिवसांपासून मालिकेतील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत आहे. या फोटोंमुळे चाहते आणखी संतापले अन् त्यांनी कृपया आमच्या भावनांशी अशी खेळू नकोस असा इशारा दिशाला दिला आहे.

अवश्य पाहा – करोनामुळे वडिलांचं निधन; आठवड्याभरातच ‘या’ अभिनेत्रीनं केलं ग्लॅमरस फोटोशूट

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय विनोदी मालिकांपैकी एक आहे. २८ जुलै २००८ रोजी या मालिकेचा पहिला भाग टीव्हीवर प्रसारीत झाला झाला होता. तेव्हापासून तब्बल १२ वर्ष ही मालिका सातत्याने लोकांना हसवत आहे. या मालिकेत काम करणाऱ्या कलाकारांचं फॅन फॉलोईंग आज कुठल्याही बॉलिवूड कलाकारापेक्षा कमी नाही. यावरुनच ‘तारक मेहता’ मालिकेच्या लोकप्रियता अंदाज आपल्याला येतो.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Disha vakani daya ben taarak mehta ka ooltah chashmah mppg
First published on: 05-11-2020 at 13:55 IST