छोट्या पडद्यावरील अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. आज दिव्यांकाचा ३७ वा वाढदिवस आहे. दिव्यांका तिच्या अभिनयामुळेच नाही तर तिच्या रिलेशनशिपमुळे ही चर्चेत राहिली होती. दिव्यांका ८ वर्षे एका अभिनेत्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती. त्यानंतर ते विभक्त झाले. एक्स बॉयफ्रेंड पुन्हा एकदा आपल्या आयुष्यात आला पाहिजे म्हणून दिव्यांकाने काळी जादू केली होती. याचा खुलासा स्वत: दिव्यांकाने एका मुलाखतीत केला आहे.

‘बनूं मैं तेरी दुल्हन’ या मालिकेत दिव्यांका अभिनेता शरद मल्होत्रासोबत काम करत होती. त्यावेळी त्यांच्यात मैत्री झाली आणि नंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. ते दोघे जवळपास ८ वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. दोघांनी यावर कधीच प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र, दिव्यांकाने एका मुलाखतीत तिच्या आणि शरदच्या ब्रेकअप विषयी सांगितले आणि म्हणाली, “आम्ही विभक्त झालो याचं दुख: मला होतं. तो पुन्हा माझ्या आयुष्यात आला पाहिजे यासाठी मी प्रचंड प्रयत्न केले. त्यावेळी मी हद्द पार केली होती. आम्ही पुन्हा एकत्र आलो पाहिजे म्हणून मी काळी जादूचीही मदत घेतली होती. पण काही झालं नाही.”

आणखी वाचा : ‘काय विचित्र प्रकार आहे…’, व्हिडीओत पॅन्टचं बटन बंद केल्यामुळे उर्फी जावेद ट्रोल

आणखी वाचा : ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीवर कतरिनाचा भाऊ फिदा! पोस्ट शेअर करत म्हणाला…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, शरद आणि दिव्यांका विभक्त झाल्यानंतर तिच्या आयुष्यात अभिनेता विवेक दहियाने एण्ट्री केली होती. ते दोघे रिलेशनशिपमध्ये आले. त्यानंतर २०१६ मध्ये ते लग्न बंधनात अडकले. त्यांच्या लग्नाला ५ वर्षे उलटली आहे. दिव्यांकाने ‘ये है मोहब्बतें’, ‘तेरी मेरी लव स्टोरी’, ‘बनूं तेरी दुल्हन’, ‘अदालत’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. ‘जोर का झटका’, ‘कॉमेडी सर्कस’, ‘बॉक्स क्रिकेट लीग 1’, ‘नच बलिए 8’ , ‘द व्हॉइस 3’, ‘खतरो के खिलाडी’ या रिअॅलिटी शोमध्ये दिव्यांका दिसली आहे.