बिग बॉस आवडत नसेल तर कार्यक्रम बघण्यात वेळ घालवू नका, असे बिग बॉसचा सूत्रसंचालक सलमान खान म्हणाला आहे. बिग बॉसच्या घरातले वाद सोडवणे आता सलमानच्याच अंगाशी आले आहे. बिग बॉस-७ चा सूत्रसंचालक असलेल्या सलमान खानवर सध्या भेदभाव करत असल्याचा आरोप होत आहे. सलमान ‘शो’मध्ये पक्षपात करत असल्याचे त्याच्या चाहत्यांचे म्हणणे आहे. तसेच तो या शोमधील स्पर्धक गौहर खानला निशाणा करत असल्याचीही चर्चा आहे.
यामुळे सलमानचे चाहते आजकाल त्याच्यावर नाराज आहेत. गेल्या काही आठवड्यापासून सलमान खान ट्विटरवर चाहत्यांची समजूत काढत आहे. मात्र आता वैतागलेल्या सलमानने, तुम्हाला जर वीकेन्ड एपिसोड आवडत नसेल, तर पाहू नका, असे म्हटले आहे. सलमानच्या ट्विटर अकाऊंटवर त्यांच्या चाहत्यांच्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
बिग बॉसचा वीकेंड एपिसोड ज्यांना पसंत आलेला नाही, त्यांनी प्लीज आपला वेळ वाया घालवू नये, असे सलमानने ट्वीट केले आहे. याशिवाय तुमच्याजवळ इतर काही गोष्टी करण्यासाठी वेळ आहे तर त्या करा. निवडणुका येत आहेत, तुम्ही मतदान करा, असेही तो म्हणाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dont waste your times watching bigg boss 7 says angry salman khan
First published on: 12-11-2013 at 12:30 IST