– अभिनेता कमलेश सावंतची स्टार प्रवाहच्या ‘नकुशी’मध्ये एण्ट्री
‘दृश्यम’ या सिनेमात पोलिसाच्या भूमिकेतील अभिनेता कमलेश सावंतनं अजय देवगणची केलेली धुलाई प्रेक्षकांना नक्कीच आठवत असेल. आता स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘नकुशी’ या मालिकेतील रणजित शिंदेची कमलेश धुलाई करणार आहे. कमलेशनं ‘नकुशी’मध्ये एण्ट्री केली असून, या मालिकेत तो पोलिसाचीच भूमिका साकारत आहे.
वाचा : जाणून घ्या, श्रेयस तळपदेच्या ‘पोस्टर बॉईज’ची पहिल्या दिवसाची कमाई
‘नकुशी’ मालिकेत बऱ्याच घडामोडी झाल्या आहेत. नकुशीचा गर्भपात झाल्याचा धक्का रणजित पचवू शकलेला नाही. त्यामुळे तो वाईट मार्गाला लागला आहे. एका प्रकरणात तो पोलिसांकडून पकडला जातो. त्याचा तपास सूर्यकांत वागळे या पोलीस अधिकाऱ्याकडे असतो. या तपासादरम्यान सूर्यकांत वागळे हा रणजितला बेदम मारतो.
कमलेशने आतापर्यंत अनेक मालिका आणि चित्रपटांतून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. त्यानं पोलिसाचीही भूमिकाही अनेकदा साकारली आहे. रफटफ लुक आणि उत्तम अभिनय ही कमलेशची खासियत आहे.
वाचा : LEAKED मेघना गुलजारच्या ‘राझी’मधील आलियाचा ‘डी-ग्लॅम’ लूक
आता रणजितनं नेमकं काय केलेलं असतं म्हणून तो पकडला जातो, पोलिसांकडून झालेल्या धुलाईचा रणजित बदला घेतो का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं ‘नकुशी’ या मालिकेच्या पुढच्या भागांमध्ये मिळणार आहेत.