मराठी अभिनेत्री निवेदिता सराफ या लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहेत. तर निवेदिता सराफ यांच्या ड्रायव्हरला किरकोळ वादातून मारहाण झाल्याची घटना घडली आहे. रविवारी रात्री १०.३० च्या सुमारास त्या विलेपार्ले इथून घरी परतत होत्या. त्यावेळी त्यांच्या गाडीला मागून दुसऱ्या गाडीने धडक दिली. तर याच दरम्यान, निवेदिता यांचा ड्रायव्हर अजय ठाकूर हा गाडीचं नुकसान झालं का हे पाहण्यासाठी खाली उतरला होता. यावेळी गाडी ठोकणाऱ्याने अजयला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तर अजयला शिवीगाळ करत त्या व्यक्तीलने मारहाण केल्याची तक्रार निवेदिता यांनी केली.

दरम्यान, “मारहाण करणाऱ्याने मलाही गाडीची काच खाली कर, असं म्हणत धमकावलं. अखेर अजयने पोलिसांना फोन करतो असं सांगताच त्याने तिथून पळ काढला. पळ काढत असतानाही त्याने एका बेस्ट चालकालाही शिवीगाळ केली.” असं त्या म्हणाल्या. या घटनेची तक्रार जुहू पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीनंतर जुहू पोलिसांनी आरोपीच्या गाडीचा तपशील मागवला आहे. त्या गाडीची नोंदणी ही नाशिकची आहे. त्यासोबत पोलिस सीसीटीव्ही फुटेजचाही तपास करत आहेत.

आणखी वाचा : धकधक गर्ल आणि रितेश देशमुखचा ‘कच्चा बादाम’वर डान्स, ४० लाखापेक्षा जास्त लोकांनी पाहिला हा Viral Video

Live Chat दरम्यान पतीच्या कर्करोगाविषयी बोलताना अभिज्ञा भावे झाली भावूक, म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी मारहाण करणाऱ्याविरोधात गुन्हा नोंदवला असून या घटनेप्रकरणी ते अधिक तपास करत आहेत. तर त्या गाडीचा नंबर MH-15-BD-9945 हा आहे. त्या गाडीची नोंदणी नाशिकची असून आम्ही मालकाचा तपास करत आहोत, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारी सुधाकर शिरसाट यांनी ‘टाइम्स ऑफिस इंडिया’शी बोलताना दिली.