६५ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची नुकतीच घोषणा करण्यात आली. दिग्दर्शक शेखर कपूर यांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या एका समितीने यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटांची निवड केली. यामध्ये मराठी चित्रपटांचीही उल्लेखनीय कामगिरी पाहायला मिळाली. त्यासोबतच ‘न्यूटन’ या हिंदी चित्रपटाच्या निमित्ताने मराठमोळ्या अमित मसूरकर याचं नावही प्रकाशझोतात आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अभिनेता राजकुमार राव याची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘न्यूटन’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा पुरस्कार जाहिर करण्यात आला. चित्रपटाच्या वाट्याला आलेलं हे यश म्हणजे अमितच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचं वळण ठरणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने त्याच्यातल्या दिग्दर्शकाचाही सन्मान झाला असं म्हणायला हरकत नाही. वयाच्या ३७ व्या वर्षी यश संपादन करणाऱ्या या दिग्दर्शकाचा सध्या अनेकांनाच हेवा वाटतोय. पण, तुम्हाला माहितीये का, अभियांत्रिकीचं शिक्षण घेतेवेळी अमितलाही अपयशाचा सामना करावा लागला होता.

‘आज तक’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार मुळच्या मंबईच्या असणाऱ्या अमितनने सुरुवातीचे काही दिवस दादरमध्ये शिक्षण घेतलं. त्यानंतर मनिपाल विद्यापीठात त्याने अभियांत्रिकीच्या शिक्षणास सुरुवात केली. पण, चित्रपटांकडेच आपला जास्त कल असल्यामुळे त्याने अभियांत्रिकीच्या शिक्षणाला रामराम ठोकत मुंबई विद्यापीठातून कला शाखेचं शिक्षण घेण्यास सुरुवात केली आणि याच शाखेतील पदवी घेत शिक्षण पूर्ण केलं.

वाचा : हॉलीवूडमध्ये प्रियांका चोप्रालाही बसली वर्णद्वेषाची झळ

‘न्यूटन’ हा अमितच्या दिग्दर्शनातील दुसरा चित्रपट. याआधी त्याने ‘सुलेमानी किडा’ या चित्रपटाचंही दिग्दर्शन केलं. होतं. पण, न्यूटनचा हा फॉर्म्युला खऱ्या अर्थाने त्याला नावारुपास आणण्यास कारणीभूत ठरला. ऑस्करच्या शर्यतीत स्थान मिळवणाऱ्या ‘न्यूटन’ला त्या शर्यतीत हार पत्करावी लागली असली तरीही राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मात्र या चित्रपटाने बाजी मारली आहे हे खरं. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अमितने सोशल मीडियाच्या माध्यमातून आनंद व्यक्त करत ज्युरींचे आभार मानले. त्यासोबतच चित्रपटाला मिळालेलं यश येत्या काळात राजकीय दृष्टीकोनानेही महत्त्वाच्या अशा चित्रपटांचं वेगळं स्थान निर्माण करेल यासाठी आपण आशावादी असल्याचंही तो या पोस्टमधून म्हणाला. त्यासोबतच त्याने चित्रपटातील स्टारकास्ट आणि छत्तीसगढमधील स्थानिकांचेही मनापासून आभार मानले.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Engineering dropped out amit v masurkar win national award for second film bollywood movie newton
First published on: 14-04-2018 at 13:00 IST