scorecardresearch
Live

Entertainment News Live : मनोरंजन क्षेत्रातील सर्व घडामोडी एकाच क्लिकवर

Top Entertainment News Today : मनोरंजन क्षेत्रातील अशा अनेक महत्वाच्या घडामोडी तुम्ही इथे एका क्लिकवर पाहू शकता.

Entertainment News Live Updates, 27 May 2022 : बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहरचा ५० वा वाढदिवस नुकतंच पार पडला. या वाढदिवसाच्या निमित्त त्याने एका पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीला बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. सध्या या वाढदिवसाच्या पार्टीची सर्वत्र चर्चा सुरु आहे. तर दुसरीकडे प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेता प्रवीण तरडे यांची मुख्य भूमिका असलेला ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपट आज प्रदर्शित होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची शौर्यगाथा या चित्रपटाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे.

मनोरंजन क्षेत्रातील अशा अनेक महत्वाच्या घडामोडी तुम्ही इथे एका क्लिकवर पाहू शकता.

Live Updates
18:10 (IST) 27 May 2022
आयुष्मान खुराना ते सोफी चौधरी, बॉलिवूडमध्ये येण्याआधी ‘हे’ कलाकार अँकर म्हणून होते प्रसिद्ध

आज बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करणारे काही कलाकार हे एकेकाळी टीव्हीसाठी अँकरिंगचं काम करायचे. या ठिकाणी नाव कमावल्यानंतर त्यांनी अभिनय क्षेत्रात आपलं नशीब आजमवलं.

फोटो पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा

17:56 (IST) 27 May 2022

Photos : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ शोमधील अभिनेत्री झळकणार ‘आश्रम ३’ वेब सीरिजमध्ये; पोस्टमुळे चर्चेला उधाण

छोट्या पडद्यावरील सगळ्यांना खळखळून हसायला लावणारा शो म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’. हास्यजत्रेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी मराठमोळी अभिनेत्री ‘आश्रम ३’मध्ये बॉबी देओलसोबत काम करताना दिसणार आहे.

फोटो पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा

16:49 (IST) 27 May 2022

Photos: आर्यन खानला NCB कडून दिलासा मिळताच शाहरुखच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी

बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबीने मुंबई क्रुज ड्रग्ज प्रकरणात क्लीन चीट दिली आहे. आर्यन खानला दिलासा मिळताच चाहत्यांनी शाहरुख खानच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर एकच गर्दी केलेली पाहायला मिळाली.

फोटो पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा

16:41 (IST) 27 May 2022
Photos: करण जोहरच्या बर्थडे पार्टीत बॉलिवूड कलाकारांचा जलवा; स्टायलिश अंदाजातील फोटो व्हायरल

बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहरचा २५ मे रोजी ५०वा वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त करणने खास पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.

पाहा फोटो

15:35 (IST) 27 May 2022
“अरे माणूस आहेस का भूत”, दिलीप प्रभावळकरांना बाळासाहेब ठाकरे असं का म्हणाले? मुख्यमंत्र्यांनी सांगितला किस्सा

मुंबईत उभ्या राहणाऱ्या मराठी नाट्य विश्व या नाट्य संग्रहालयाच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. यावेळी उद्धव ठाकरेंनी दिलीप प्रभावळकर यांच्या गाजलेल्या हसवाफसवीच्या प्रयोगाची आठवण सांगितली आहे.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा

15:34 (IST) 27 May 2022
“मुलीसाठी नाव सुचवा” लेकीसोबतचा क्यूट व्हिडीओ शेअर करत कैलास वाघमारेने चाहत्यांना केली विनंती

‘सुखं म्हणजे नक्की काय असतं!’ या मालिकेत देवकीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मिनाक्षी राठोड ही काही दिवसांपूर्वीच आई बनली आहे. मिनाक्षी आणि अभिनेता कैलास वाघमारे यांना कन्यारत्न प्राप्त झाले आहे. नुकतंच कैलासने लेकीसोबत खेळतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा

14:01 (IST) 27 May 2022
Video: रणजीत ढालेपाटील पुन्हा दिसणार वर्दीत! ‘राजा राणीची गं जोडी’ मालिकेत नवं वळण

कलर्स मराठीवरील ‘राजा राणीची गं जोडी’ ही मालिका सध्या बरीच गाजताना दिसतेय. या मालिकेत अभिनेत्री शिवानी सोनार आणि अभिनेता मनिराज पवार यांच्या मुख्य भूमिका आहेत. मालिकेत या दोघांनी साकारलेल्या ‘रणजीत ढालेपाटील’ आणि ‘संजीवनी ढालेपाटील’ या भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेल्या या मालिकेत लवकरच रंजक वळण येणार आहे. रणजीत ढालेपाटील म्हणजेच अभिनेता मनिराज पवार पुन्हा एकदा खाकी वर्दीत दिसणार आहे.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा

13:58 (IST) 27 May 2022
लाइट्स, कॅमेरा अँड अ‍ॅक्शन! जिनिलिया डिसूझाने सुरू केलं नव्या चित्रपटाचं शूटिंग

बॉलिवूड अभिनेत्री जिनिलिया देशमुख मागच्या काही वर्षांपासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. रितेश देशमुखशी लग्न केल्यातर जिनिलिया करिअरमधून ब्रेक घेत संसारात रमली. मात्र आता पुन्हा एकदा चित्रपटांमध्ये पुनरागमन करण्यासाठी ती सज्ज झाली आहे. लवकरच ती ‘मिस्टर मम्मी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अलिकडेच तिने पती रितेश देशमुखसोबत या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं. त्यानंतर आता तिनं आणखी एका आगामी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा

13:57 (IST) 27 May 2022
Bhirkit Trailer : राजकारण, कुटुंब अन्…; ‘भिरकीट’चा धम्माल विनोदी ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये सध्या ‘भिरकीट’ नावाचे हास्याचे वादळ येत आहे. ‘भिरकीट’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून हे वादळ १७ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहांत येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा संगीत सोहळा पार पडला. चित्रपटाची गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस आल्यानंतर आता चित्रपटाचीउत्सुकता वाढवणारा ट्रेलरही भेटीला आहे.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा

13:56 (IST) 27 May 2022
‘मस्जिद है या शिवाला…’ ज्ञानवापी मशीद वादानंतर मनोज मुंतशीर यांची कविता व्हायरल

देशात सध्या ज्ञानवापी मशिदीचा वाद चांगलाच गाजतोय. अशात गीतकार मनोज मुंतशीर यांची एक कविता सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ता विनोद बंन्सल यांनी त्यांच्या ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मनोज मुंतशीर ‘मस्जिद है या शिवाला, पत्थर गवाही देंगे’ ही कविता सादर करताना दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा

13:41 (IST) 27 May 2022
‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिका रंजक वळणावर, नेहा आणि यशचा साखरपुडा लवकरच पार पडणार

माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केले आहे. या मालिकेत आता लवकरच एक सुखद वळण पाहायला मिळणार आहे. या मालिकेत लवकरच नेहा आणि यशचा लवकरच साखरपुडा पार पडणार आहे.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा

13:38 (IST) 27 May 2022
‘सात संमदर पार’ गाण्यावर नोरा फतेहीने केली लावणी, व्हिडीओ व्हायरल

नोरा फतेहीला बॉलिवूडमधील आघाडीची डान्सर म्हणून ओळखले जाते. नुकतंच नोरा फतेहीचा डान्स करतानाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत नोरा ही चक्क लावणी करताना दिसत आहे.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Web Title: Entertainment news live bhool bhulaiyaa 2 aishwarya rai kareena kapoor selfie in faran johar party ritesh deshmukh post today 27 may