बॉलिवूड अभिनेत्री अमृता अरोरा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. ती नेहमीच इन्स्टाग्रामवर तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. नुकताच तिने सोशल मीडियावर एक रोमँटिक फोटो शेअर केला आहे. ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्या फोटोमध्ये अमृतासोबत असलेली व्यक्ती अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा असल्याचं बोललं जात आहे. अनेकांनी यावरून अमृताला सोशल मीडियावर ट्रोल केलं आहे.
अमृतानं तिच्या इन्स्टाग्रामवर एक अंडरवॉटर फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती पती शकीलला किस करताना दिसत आहे. पण या फोटोमध्ये शकीलचा चेहरा अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राशी मिळता- जुळता दिसत आहे. ज्यावरून अमृताला सोशल मीडियावर ट्रोल केलं जातंय. तिचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
एका युजरनं अमृताच्या फोटोवर कमेंट करताना लिहिलं, ‘मला वाटतं हा राज कुंद्रा आहे.’ दुसऱ्या एका युजरनं लिहिलं, ‘एका सेकंदासाठी मला वाटलं की तो राज कुंद्रा आहे.’ तर इतरही अनेक युजरनी अशा आशयाच्या कमेंट करताना अमृता आणि शकीलच्या या फोटोवर टीका केली आहे. मात्र या फोटोमध्ये असलेली व्यक्ती ही राज कुंद्रा नसून अमृता अरोराचा पती शकील आहे.

अमृता अरोरानं २००९ साली कंन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमधील बिझनेसमन शकील लडकशी लग्न केलं होतं. या दोघांना अजान आणि रियान नावाची दोन मुलं आहेत. अमृताच्या करिअरबद्दल बोलायचं तर २००२ साली तिनं फरदीन खानसोबत ‘कितने दूर कितने पास’ या चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण केलं होतं. त्यानंतर ती ‘आवार पागल दीवाना’ चित्रपटात दिसली होती. मात्र तिचं बॉलिवूड करिअर फारसं चाललं नाही.