सध्या सोशल मीडियावर विमानतळावरील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण नशेच्या धुंदीत चक्क विमानतळावर लघुशंका करताना दिसत आहे. हा व्हिडीओमध्ये दिसणारा तरुण बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान असल्याचा दावा नेटकरी करत आहेत. आर्यन खानला एनसीबीने ड्रग्ज प्रकरणात ३ ऑक्टोबर रोजी अटक केली होती आणि जवळपास तीन आठवड्यांनंतर त्याचा जामीन मंजुर करण्यात आला होता.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एक तरुण नशेच्या धुंदीत विमानतळावर उभा असल्याचे दिसत आहे. त्याच्या शेजारीच विमानतळावरील अधिकारी लाल कपड्यांमध्ये उभा असल्याचे दिसत आहे. तो अधिकारी त्या तरुणाशी बोलत असतो तेवढ्यात तो तरुण नशेच्या धुंदीत लघुशंका करण्यास सुरुवात करतो. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. एका ट्विटर यूजरने तो शेअर करत, ‘विमानतळावर आर्यन खान (शाहरुख खानचा मुलगा) नशेत असल्याचे दिसत आहे’ असे म्हटले आहे. त्यामुळे व्हिडीओमध्ये दिसणारा तरुण आर्यन खान आहे की आणखी कुणी असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
आणखी वाचा : जर साहेब इथे असते तर…; ‘किचन कल्लाकार’च्या मंचावर पंकजा मुंडेंच्या डोळ्यात आलं पाणी

Bomb threat at Mumbai airport case registered
मुंबई : विमानतळावर बॉम्बची धमकी, गुन्हा दाखल
Wasim Akram Reacts On Hardik- Rohit Controversy
हार्दिक पंड्याच्या मुलाचा उल्लेख करत वसीम अक्रमने हार्दिक- रोहितबाबत वादावर मांडलं मत; म्हणाला, “२० वर्षांपूर्वी..”
Puppy beaten, Pimpri,
Video : पिंपरीत श्वानाच्या पिल्लाला बेदम मारहाण; गुन्हा दाखल, मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल
Bengluru
VIDEO : ‘जय श्री राम’ म्हटल्याने बंगळुरूमध्ये तिघांवर हल्ला, झेंडाही पळवला

इंडिया टूडेने दिलेल्या वृत्तानुसार, व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमधील तरुण हा आर्यन खान नसून ‘ट्वायलाइट’ या हॉलिवूड चित्रपटात काम करणारा कॅनेडियन अभिनेता ब्रॉन्सन पेलेटियर आहे. त्याचा हा व्हिडीओ २०१२मध्ये व्हायरल झाला होता. असे कृत्य केल्यानंतर ब्रॉन्सरला पोलिसांनी अटक केली होती.

व्हायरल होणारा हा व्हिडीओ डिसेंबर २०१२मधील लॉस एंजेलिस विमानतळावरील आहे. पेलेटियर नशेत असल्यामुळे त्याला विमानातून उतरवण्यात आले होते. त्याला काही वेळ आराम करण्यास सांगण्यात आले होते. पण काही वेळानंतर तो विमानतळावर लघुशंका करताना दिसला होता. या कृत्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. काही दिवसांनंतर तो दोषी आढळला आणि त्याला शिक्षा झाली. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमधील तरुण आर्यन खान नसल्याचे स्पष्ट झाले आहे.