अभिनेत्री गौहर खानवर चाहत्यांच्या प्रश्नांचा भडिमार

लोकप्रिय अभिनेत्री गौहर खान आणि पती जैद दरबार यांनी डिसेंबर महिन्यात लग्नं केले. यानंतर आता “तुम्ही फॅमिली प्लॅनिंग कधी करणार? तु लग्नना नंतर एवढं काम का करतेस?” अशा बऱ्याच प्रश्नाची उत्तर गौहर खानने या रील मध्ये दिली आहेत.

gauhar-khan-answers
Photo-Loksatta File Photos

‘बिग बॉस’ फेम गौहर खान आणि तिचा पती जैद दरबार यांची जोडी नेहमीच चर्चेत असते. या जोडीला बॉलिवूडमधल्या लोकप्रिय जोडीच्या यादीत पाहिलं जातं. हे दोघेही नेहमीच सोशल मीडियावर एकमेकांप्रती असलेलं प्रेम व्यक्त करताना दिसतात. तसे रील आणि फोटोद्वारे फॅन्सचे मनोरंजन करत असतात. गेल्या डिसेंबर महिन्यातच या दोघांचा निकाह पार पडला. त्यानंतर हे दोघे ६ महिन्यांनी हनीमूनला गेले होते. अश्यात आता त्यांचे चाहते त्यांना तुम्ही फॅमिली प्लॅनिंग कधी करणार? तु लग्ना नंतर एवढं काम का करतेस असे बरेच प्रश्न फॅन्स विचारताना दिसत आहे. आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरे गौहर खानने रिलमधे दिली आहेत.

गौहर खानने एक रिल तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यात तिने फॅन्सच्या काही प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. एका फॅनने पहिला प्रश्न असा विचारला की, “तु बेबी कधी प्लान करणार?” यावर गौहरने उत्तर दिले की, “जेव्हा अल्लाची मर्जी असेल तेव्हा बेबी होईल.” दुसऱ्या फॅनने विचारले की “तु तुझ्या सासरच्यांसोबत का नाही राहात?” यावर गौहर म्हणाली की, “मी आणि माझ्या नवऱ्याने जे आम्हाला योग्य वाटलं ते आम्ही केलं.” तिसऱ्या फॅनने विचारले “लग्नं झाल्यावर तू  सारखी काम का करताना दिसतेस?.” यावर गौहर म्हणाली की, “२० वर्ष झाली मी या इंडस्ट्रीमध्ये काम करतं आहे, आणि ८० वर्षाची होईपर्यंत मला काम करायचे आहे.” असे ती म्हणाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Gauahar Khan (@gauaharkhan)

गौहर खान बरेच वर्ष झाली या क्षेत्रात काम करत आहे. तिने  ‘इशकजादे’, ‘बेगम जान’ अश्या बऱ्याच चित्रपटात काम केले  आहे. गौहर खान तिच्या निकाहच्या नंतर लगेच ‘१४ फेरे’या चित्रपटाचे शुटिंग करायला गेली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Fans ask gauhar khan about family planning on which she says aad