बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांचा विवाहसोहळा १९ फेब्रुवारी रोजी पार पडला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्या दोघांच्या लग्नाची सोशल मीडियावर चर्चा पाहायला मिळत होती. लग्नानंतर ते दोघेही एकपाठोपाठ पार्टीत सहभागी होताना दिसत आहेत. नुकतंच चित्रपट निर्माता रितेश सिधवानी यांनी शिबानी आणि फरहानसाठी एका भव्य पार्टीचे आयोजन केले होते. यात अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली. या पार्टीमध्ये बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या कुटुंबानेही हजेरी लावली. त्यावेळीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

चित्रपट निर्माता रितेश सिधवानी याने आयोजित केलेल्या या पार्टीत अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी सहभागी झाले होते. या पार्टीचे अनेक व्हिडीओ समोर आले होते. यातील एका व्हिडीओत शाहरुख खानची मुलगी सुहाना खान आणि मुलगा आर्यन खान दिसत आहे. यावेळी त्या दोघांवर सर्वांच्या नजरा खिळल्या.

या पार्टीसाठी सुहानाने काळ्या रंगाचा ऑफ शोल्डर वनपीस परिधान केला होता. तर आर्यन खान हा कॅज्युअल लूकमध्ये पाहायला मिळाला. आर्यन आणि सुहाना गाडीतून उतरल्यानंतर चित्रपट निर्मात्या फराह खानने त्यांचे स्वागत केले. तिने आर्यनला घट्ट मिठी मारली. याबाबतचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यासोबतच या पार्टीत रिया चक्रवर्ती, हृतिक रोशन, फराह खान, शंकर महादेवन यांसारख्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली.

दरम्यान, शिबानी दांडेकर आणि फरहान अख्तर यांच्या लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. लग्नासाठी शिबानीनं लाल रंगाचा वेडिंग गाऊन परिधान केला होता. ज्यात ती खूपच सुंदर दिसत होती. तर फरहान अख्तरने काळ्या रंगाचा सूट परिधान केला होता. दोघांनीही अत्यंत साध्या पद्धतीनं आणि मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न केलं. हे लग्न जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांच्या खंडाळा स्थीत फार्महाऊसवर पार पडलं.

“…पण आता दारुची सर्व दुकान उघडली आहेत”, कपिल शर्माच्या वादग्रस्त ट्वीटची शिल्पा शेट्टीने उडवली खिल्ली

फरहान अख्तर आणि शिबानी यांचं लग्न सध्या सर्वाधिक चर्चेत आहे. कारण या लग्नात दोघांनीही हिंदू रिवाजानुसार सप्तपदी घेतली नाही किंवा मुस्लीम रिवाजानुसार निकाह केला नाही. शिबानी आणि फरहाननं Vow ( शपथ किंवा वचन) आणि रिंग सेरेमनी करत एकमेकांनासोबत जीवन व्यतित करण्याचा निर्णय घेतला. या दोघांच्या या हटके लग्नाची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे. याआधी फेब्रुवारीच्या सुरुवातीला दोघांनीही रजिस्टर मॅरेज केलं होतं.