अभिनेत्री अनन्या पांडेनं फार कमी वेळातच बॉलिवूडमध्ये स्वतःची जागा तयार केली आहे. मोजक्याच चित्रपटांमध्ये दिसलेली अनन्या पांडे सोशल मीडियावर मात्र बरीच सक्रीय असते आणि अनेकदा तिच्या पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात. सोशल मीडियावर सक्रीय असणारी अनन्या या व्यतिरिक्त तिच्या फॅशनमुळेही चर्चेत राहते. बरेचदा तिला तिच्या कपड्यांमुळे ट्रोलही केलं जातं. अलिकडेच एका पार्टीमध्ये परिधान केलेल्या गाऊनमुळे अनन्याला सोशल मीडियावर ट्रोल केलं गेलं. त्यावर आता तिचे वडील चंकी पांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अनन्या पांडेनं काही दिवसांपूर्वीच निर्माता अपूर्व मेहताच्या ५० व्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिने परिधान केलेला ड्रेस सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला होता. या पार्टीमध्ये अनन्यानं कोर्सेट बॉडीसूटसह बॅक थाइ-हाय स्लिट शीयर ड्रेस परिधान केला होता. पण जेव्हा या ड्रेसमधील तिचे फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले तेव्हा मात्र यावरून तिच्यावर टीका करण्यात आली.

आणखी वाचा- कलियुगातल्या राक्षसाला फाडणार क्रुद्ध नरसिंह! ‘शेर शिवराज’चा अंगावर काटा आणणारा टीझर पाहिलात का?

पार्टीमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी तिची तुलना मॉडेल उर्फी जावेदशी केली. तर काही लोकांनी अनन्याचा ड्रेसिंग सेन्स खूपच वाईट असल्याचंही म्हटलं होतं. यावर आता तिचे वडील आणि अभिनेता चंकी पांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एका वेबसाइटशी बोलताना चंकी पांडे म्हणाले, ‘एक आई- वडील म्हणून आम्ही नेहमीच तिला विचारांचं स्वातंत्र्य दिलं आहे. तिने कोणते कपडे परिधान करावेत किंवा कोणते नाहीत याबाबत आम्ही कधीच तिला सल्ला दिला नाही. दोन्ही मुलींना आम्ही खूप चांगली शिकवण दिली आहे आणि त्या खूप समजूतदार आहेत.’

आणखी वाचा- The Kashmir Files वर अखेर आमिर खाननं सोडलं मौन, म्हणाला “जेव्हा एका व्यक्तीवर अत्याचार…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चंकी पांडे पुढे म्हणाले, ‘आज अनन्या इंडस्ट्रीमध्ये काम करते. तिला तिथे ग्लॅमरस दिसण्याची गरज आहे. मला माझ्या मुलींबद्दल एक गोष्टी चांगल्या प्रकारे माहीत आहे की त्यांच्यात एक विशिष्ट प्रकारची निरागसता आहे. मला खात्री आहे त्या काहीही परिधान करू शकतात आणि त्यात त्या अजिबात अश्लील दिसणार नाहीत. तुम्ही जे परिधान करता त्यावर लोकांनी हसणं खूपच सामान्य बाब आहे. म्हणून हे सर्व आपण कौतुकाप्रमाणेच घेतलं पाहिजे. जर त्यांच्या आई- वडिलांना याबाबत समस्य नसेल तर इतर कोणालाही याबाबत वाईट वाटू नये.’