शिवरायांचे पराक्रम, त्यांची यशोगाथा हा कायमच आपल्यासाठी अभिमानाचा आणि तितकाच कुतूहलाचाही विषय राहिला आहे. महाराजांची युद्धनीती, त्यांचे संघटन कौशल्य आणि गनिमी काव्याच्या जोरावर फत्ते केलेल्या अनेक मोहिमा हा सारा इतिहास माहिती असला तरी त्या प्रत्येक मोहिमेचे, महाराजांच्या अनेक निर्णयांचे असे काही पैलू आहेत जे आजही लोकांपर्यंत पोहोचले नाहीत. महाराजांचा गनिमी कावा आपल्याला माहिती आहे, परंतु त्यांनी केलेल्या पहिल्या सर्जिकल स्ट्राइकविषयी फार कमी जणांना माहित आहे. त्यामुळे त्यांच्या पहिल्या सर्जिकल स्ट्राइकची कथा लवकरत ‘फत्तेशिकस्त’ या चित्रपटातून उलगडण्यात येणार आहे. त्यामुळे सर्जिकल स्ट्राइक आणि फत्तेशिकस्त यांचं नेमकं कनेक्शन काय आहे हे चित्रपटाचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी लोकसत्ता ऑनलाइनसोबत बोलताना सांगितलं.
वाचा : ‘फत्तेशिकस्त’ : हे कलाकार उलगडणार इतिहासाची पाने