Manoranjan News Updates : गुजराती चित्रपट निर्माते महेश जिरावाला यांचे अहमदाबाद विमान अपघातात निधन झाले आहे. ते विमान अपघाताच्या दिवसापासून (१२ जून २०२५) बेपत्ता होते. त्यानंतर तेही विमान अपघातात मृत्यू पावलेल्या लोकांपैकी एक असू शकतात, असं म्हटलं जात होतं. आता डीएनए अहवालात त्यांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे. महेश यांचा मृतदेह त्याच्या कुटुंबियांना सोपवण्यात आला आहे.

गुजराती माध्यमांच्या वृत्तानुसार, महेश जिरावाला एअर इंडियाचे विमान जिथे कोसळले त्या ठिकाणी होते. अपघातस्थळावरून त्यांची स्कूटर सापडली होती, जी जळालेल्या अवस्थेत होती. तसेच महेश यांच्या मोबाईलचे लोकेशन ट्रॅक करण्यात आले होते, ते शेवटचे अपघातस्थळीच होते, असं त्यातून स्पष्ट झालं होतं.

महेश यांचे कुटुंबीय त्यांचे निधन झाले, हे स्वीकारायला तयार नव्हते. त्यांना महेश यांच्या मृत्यूचा मोठा धक्का बसला होता. पोलिसांनी त्यांच्या स्कूटरचा चेसिस नंबर व डीएनए रिपोर्ट कुटुंबियांना दाखवले, त्यानंतर त्यांनी मृतदेह घेतला. महेश यांच्या पश्चात पत्नी व दोन मुलं आहेत.

Live Updates

Entertainment News Today

18:30 (IST) 21 Jun 2025

"युझी भाई ने इसका करिअर बना दिया", म्हणणाऱ्या ट्रोलर्सना आरजे माहवशचं चोख उत्तर; म्हणाली, "जोपर्यंत तुम्ही…"

RJ Mahvash reply to trolls : आरजे माहवशने कमेंटचा स्क्रीनशॉट शेअर करत ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं आहे. ...वाचा सविस्तर
18:02 (IST) 21 Jun 2025

"निर्मात्यांनी ९ लाख थकवले…", मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप; म्हणाला, "आत्महत्या हा पर्याय नाहीये पण…"

"कृपया जागे व्हा आणि निदान...", अभिनेता अजिंक्य राऊतचे निर्मात्यांनी पैसे थकवले, व्हिडीओ शेअर करत म्हणाला... ...वाचा सविस्तर
17:55 (IST) 21 Jun 2025

प्रसिद्ध अभिनेत्रीचा १५ वर्षांचा संसार मोडला, इन्स्टाग्रामवर केली घोषणा; पतीची पहिली बायको होती मराठमोळी अभिनेत्री

Lataa Saberwal Separation From Sanjeev Seth: मालिकेच्या सेटवर भेट अन् घटस्फोटित अभिनेत्यासह थाटला संसार; प्रसिद्ध अभिनेत्री पतीपासून झाली विभक्त ...सविस्तर बातमी
17:51 (IST) 21 Jun 2025

४० वर्षांपूर्वी 'या' अभिनेत्यालाही एअर इंडियाच्या विमान अपघातात गमवावा लागला जीव; सचिन पिळगांवकर यांच्या चित्रपटात केलेलं काम

40 Years Ago Inder Thakur Lost His Life In Air India Flight : याआधीही जगात अनेक विमान अपघात झाले आहेत, ज्यात अनेक प्रसिद्ध कलाकारांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. ...अधिक वाचा
17:14 (IST) 21 Jun 2025

International Yoga Day 2025 : 'आई कुठे काय करते'फेम अभिनेता बायकोकडून घेतोय योगाचे धडे, व्हिडीओ केला शेअर

Niranjan Kulkarni : योग दिनानिमित्त मराठी अभिनेत्याने शेअर केला व्हिडीओ ...सविस्तर बातमी
16:55 (IST) 21 Jun 2025

बेशुद्धावस्थेत पडून होता करिश्मा कपूरचा एक्स पती संजय कपूर, मैदानावरच देण्यात आलेला CPR, मृत्यूपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल

Sunjay Kapur Last Video : संजय कपूरचे १२ जून रोजी इंग्लंडमध्ये पोलो खेळताना वयाच्या ५३ व्या वर्षी निधन झाले. ...वाचा सविस्तर
16:43 (IST) 21 Jun 2025

हातात टाळ, डोक्यावर तुळस अन्…; पंढरपूरच्या वारीत सहभागी झाली लोकप्रिय मराठी अभिनेत्री, खास व्हिडीओ केला शेअर

Marathi Actress Share Wari Video : विठुरायाच्या भक्तीत तल्लीन झाली लोकप्रिय अभिनेत्री, नागराज मंजुळेंच्या गाजलेल्या चित्रपटात केलंय काम ...अधिक वाचा
16:31 (IST) 21 Jun 2025

पहिल्या भेटीतच काजोलवर चिडला होता शाहरुख खान, अभिनेत्रीने सांगितलं कारण; म्हणाली, "तो मला…"

Kajol : 'अशी' होती काजोल व शाहरुख खानची पहिली भेट ...सविस्तर वाचा
16:17 (IST) 21 Jun 2025

शाहरुख खानच्या मन्नतमध्ये अनधिकृत बांधकाम? तक्रार दाखल; अभिनत्याच्या मॅनेजरने दिली प्रतिक्रिया

Shah Rukh Khan : शाहरुख खानच्या मन्नतमध्ये सुरू आहे अनधिकृत काम? बीएमसीने केली तपासणी ...वाचा सविस्तर
16:16 (IST) 21 Jun 2025

'लक्ष्मीच्या पाऊलांनी' फेम अक्षर कोठारीचं लग्न! 'ठरलं तर मग' मालिकेतील 'या' अभिनेत्रीची उपस्थिती; म्हणाल्या, "तुझ्यासाठी…"

Lakshmichya Pavalani Fame Akshar Kothari Wedding : 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' फेम अक्षर कोठारी अडकला लग्नबंधनात, अभिनेत्याला शुभेच्छा देत 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्री म्हणाली... ...सविस्तर वाचा
15:55 (IST) 21 Jun 2025

करिश्माच्या लग्नाच्या दिवशी संजय कपूरसमोरच 'या' अभिनेत्याने केलेलं असं काही की…; 'तो' व्हिडीओ होतोय व्हायरल

Akshaye Khanna kissed rumoured ex Karisma Kapoor's hand on her wedding : 'या' अभिनेत्याने सर्वांसमोर करिश्माच्या लग्नाच्या दिवशी केलेलं असं काही की...; व्हिडीओ व्हायरल ...वाचा सविस्तर
15:43 (IST) 21 Jun 2025

१५ व्या वर्षी घरातून पळून जाऊन केलं लग्न, ९ वर्षांत झाला घटस्फोट; अभिनेत्री दुसरं लग्न करण्याआधी झालेली आई

Puja Banerjee Personal Life: टीव्हीवर पार्वतीची भूमिका साकारून लोकप्रिय झालेल्या अभिनेत्रीची गोष्ट ...सविस्तर वाचा
14:48 (IST) 21 Jun 2025

अनुपम खेर यांनी 'टाईम्स स्क्वेअर'जवळ केला योगा, पोस्ट शेअर करत म्हणाले, "चांगल्या वातावरणात…"

Anupam Kher On Yoga Day : अनुपम यांनी टाइम्स स्क्वेअर येथे साजरा झालेल्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे व्हिडीओ आणि फोटो शेअर केले आहेत. ...सविस्तर वाचा
13:52 (IST) 21 Jun 2025

घरात कुजलेल्या अवस्थेत आढळला प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृतदेह, एका आठवड्यापूर्वी निधन झाल्याची पोलिसांची माहिती

Actress Ayesha Khan Found Dead : आयेशा खानने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं होतं. ...वाचा सविस्तर
13:31 (IST) 21 Jun 2025

"पक्ष फोडून आमदार गोळा करायचं मुलांनी पहिलीपासून शिकायचं…"; हिंदी सक्तीबद्दल मराठी लेखकाची खोचक पोस्ट, म्हणाले…

Marathi Writer on Hindi Language : हिंदी भाषा सक्तीसंदर्भात मराठी लेखकाची पोस्ट चर्चेत, म्हणाले.. ...वाचा सविस्तर
13:30 (IST) 21 Jun 2025

'पंचायत' फेम अभिनेत्रीने इंडस्ट्रीत 'आउटसायडर' असल्याबद्दल व्यक्त केलं दु:ख, म्हणाली…

Panchayat Fame Actress : 'आउटसाइडर' असल्यामुळे मिळत नाहीय आदर? लोकप्रिय अभिनेत्रीने व्यक्त केलं दु:ख, पोस्ट चर्चेत ...वाचा सविस्तर
12:49 (IST) 21 Jun 2025

अक्षय कुमारचे फिटनेस सिक्रेट माहितीये का? वजन कमी करण्यासाठी अभिनेता पाण्यात मिसळतो 'हा' पदार्थ

Akshay Kumar fitness secret : अक्षय कुमारने वजन कमी करण्यासाठी आणि चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी एक सोपा उपाय सांगितला ...वाचा सविस्तर
12:14 (IST) 21 Jun 2025

"मी अजून छान काम करू शकले असते…", 'छावा' फेम अभिनेत्रीने व्यक्त केलं मत, म्हणाली, "छोटी भूमिका…"

Chhaava Movie : "'छावा' मधील भूमिका साकारणं आव्हानात्मक होतं", प्रसिद्ध अभिनेत्रीचं वक्तव्य ...वाचा सविस्तर
11:25 (IST) 21 Jun 2025

मित्राला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर अविनाश नारकर यांची भावूक पोस्ट; व्हिडीओ शेअर करत म्हणाले, "देवा कोणाची नजर…"

Avinash Narkar : अविनाश नारकर यांची मित्र व अभिनेते अमोल बावडेकर यांच्यासाठी भावुक पोस्ट ...सविस्तर वाचा
11:21 (IST) 21 Jun 2025

"आई असेपर्यंत मी कोणालाच…", अभिनेते मिलिंद गवळी यांची भावुक पोस्ट; म्हणाले, "कधी स्वप्नात सुद्धा वाटलं नाही…"

Milind Gawali post on his mothers birthday : ...वाचा सविस्तर
11:18 (IST) 21 Jun 2025

प्रियांका चोप्राबरोबर सेटवर घडलेला मोठा अपघात; अभिनेत्री थोडक्यात बचावली, म्हणाली, "पावसात असं काही…"

Priyanka Chopra Got Injured While Shooting : प्रियांका चोप्राच्या 'या' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान घडली होती मोठी घटना; अभिनेत्री म्हणाली... ...सविस्तर बातमी
11:08 (IST) 21 Jun 2025

'झी मराठी'च्या 'पारू' मालिकेत आला नवा पाहुणा! कोण आहे तो? 'दे धक्का' फेम लोकप्रिय अभिनेत्याची Serial मध्ये एन्ट्री, पाहा...

Zee Marathi Paaru Serial : लोकप्रिय अभिनेत्याची 'झी मराठी'च्या 'पारू' मालिकेत एन्ट्री, पारू-आदित्यच्या आयुष्यात काय नवीन वळण येणार? ...सविस्तर वाचा
10:11 (IST) 21 Jun 2025

काम मिळत नसल्याने मराठी अभिनेत्याने केली आत्महत्या, मित्र म्हणाला, "तू हरलास म्हणजे आम्ही सगळे हरलो"

Marathi Actor Tushar Ghadigaonkar passed away : "का? कशासाठी?" मराठी अभिनेत्याने आत्महत्या केल्यावर मित्राची भावुक पोस्ट ...सविस्तर वाचा
10:10 (IST) 21 Jun 2025

आमिर खान-जिनिलीयाच्या Sitaare Zameen Par ने पहिल्या दिवशी किती कलेक्शन केले? आकडेवारी आली समोर

Sitaare Zameen Par Box Office Collection Day 1 : सितारे जमीन परच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडे आले समोर ...सविस्तर बातमी

film maker Mahesh Jirawala Died in plane crash DNA test confirms(1)

महेश जिरावाला यांचे निधन (फोटो - इन्स्टाग्राम)

अहमदाबाद विमान अपघातात गुजराती चित्रपट निर्माते महेश जरिवाला यांचे निधन झाले आहे. डीएनए टेस्टवरून त्यांच्या मृतदेहाची ओळख पटवण्यात आली.