बॉलीवूड चित्रपट निर्माता-दिग्दर्शक समीर कर्णिकला आज (शनिवारी) सेवाकर विभागाने १.१८ कोटींचा कर चुकावल्यामुळे अटक केली होती. मात्र, त्यानंतर न्यायालयाने जामीन मंजूर केल्यामुळे त्याची सुटका करण्यात आली.
सेवाकर विभागाचे उपायुक्त समीर वानखेडेंच्या नेतृत्वाअंतर्गत करण्यात आलेल्या तपासात असे आढळले की, कर्णिकने ‘यमला पगला दीवाना’ चित्रपटासाठी एका वितरण कंपनीला ११.५० कोटींची कॉपीराइट सेवा दिली होती. या व्यवहारात गोळा झालेला १.१८ कोटींचा सेवाकर कर्णिकने अधिका-यांकडे जमा केलेला नाही.
याप्रकरणी, अभिनेता सन्नी देओलही आरोपी आहे. मात्र, त्याला अटक करण्यात आलेली नाही. त्याच्या कंपनीकडून कर रुपात मागण्यात आलेल्या १.९५ कोटींपैकी त्याने ८६ लाखांचा कर जमा केल्याने त्याची अटक टळली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 24th Aug 2013 रोजी प्रकाशित
सेवाकर चुकवल्यामुळे निर्माता समीर कर्णिकला अटक
बॉलीवूड चित्रपट निर्माता-दिग्दर्शक समीर कर्णिकला आज (शनिवारी) सेवाकर विभागाने १.१८ कोटींचा कर चुकावल्यामुळे अटक केली होती.
First published on: 24-08-2013 at 11:51 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Film producer samir karnik arrested for service tax evasion