Firing at Kapil Sharma’s Cafe in Canada : प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा याने काही दिवसांपूर्वी कॅनडा येथे कॅफे सुरू केला आहे. कपिलच्या या कॅफेचं नाव ‘कॅप्स कॅफे’ असं असून या कॅफेवर महिनाभरात दुसऱ्यांदा गोळीबार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, कॅनडातील सरे येथे असलेल्या या कॅफेवर गुरुवारी सकाळी गोळीबार करण्यात आला. पहिला हल्ला झाल्यानंतर, १० जुलै रोजी कॅफे पुन्हा एकदा सुरू करण्यात आला होता, त्यानंतर अगदी काही आठवड्यांनंतरच ही घटना घडली आहे.

कपिल शर्माचा हा कॅफे ८५ अव्हेन्यू आणि स्कॉट रोडच्या चौकात असून यावर पहाटेच्या सुमारास हा गोळीबार करण्यात आला, ज्यामध्ये कॅफेच्या खिडक्यांना गोळीबारामुळे छिद्र पडल्याचे दिसून आले. हा हल्ला झाला तेव्हा काही कर्मचारी कॅफेमध्ये होते मात्र यामध्ये कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.

सोशल मीडियावर पोस्ट करत घेतली जबाबदारी

कथितपणे लॉरेन्स बिश्नोई गँगमधील एका सदस्याकडून सोशल मीडियावर पोस्ट करत या हल्ल्याची जबाबदारी घेण्यात आली आहे. पोस्टमध्ये लिहिले आहे की, “जय श्री राम, सत श्री अकाल, सर्व भावांना राम-राम. आज कपिल शर्माच्या सरे येथील कॅप्स कॅफेवर जी फायरिंग झाली त्याची जबाबदारी गोल्डी ढिल्लों आणि लॉरेन्स बिश्नोई गँग घेते. आम्ही त्याला फोन केला होतास पण त्याने फोन उचलला नाही, त्यामुळे कारवाई करावी लागली, जर अता देखील उत्तर मिळाले नाही तर पुढील अॅक्शन लवकरत मुंबईमध्ये होईल,” असे पोस्टमध्ये म्हटले आहे.

१० जुलै रोजी याच कॅफेवर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी बब्बर खालसा इंटरनॅशनल (बीकेआय) ऑपरेटीव्ह हरजित सिंग लड्डी याने घेतली होती, हा भारतात मोस्ट वॉन्टेड फरारी असून याने देखील सोशल मीडियावर पोस्ट करत हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. तसेच तूफान सिंग नावाच्या दुसऱ्या एका व्यक्तीसह, लड्डी याने निहंग शिखांबद्दल कपिल शर्माने केलेल्या कथित अपमानास्पद टिप्पणी हे या हल्ल्याचे कारण असल्याचे म्हटले होते.

आज (गुरूवार) सकाळी झालेल्या या हल्ल्यावेळी किमान सहा गोळ्या झाडण्यात आल्या. यानंतर सरे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

आज (गुरूवार) सकाळी झालेल्या या हल्ल्यावेळी किमान सहा गोळ्या झाडण्यात आल्या. यानंतर सरे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

१० जुलै रोजी गोळीबार झाल्यानंतर २० जुलै रोजी कपिल शर्माने इस्टाग्रामवर पोस्ट करत कॅफे पुन्हा सुरू झाल्याचे सांगितले होते.