‘आ वै जा सा ‘ हा कोकणी भाषेतील पहिला बालचित्रपट येत्या जुलै महिन्यामध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट निश्चितपणे वेगळ्या पठडीतील चित्रपट ठरणार आहे. लहान आणि फारशा लहान नसलेल्या मुलांना देखील बरेच काही या चित्रपटातून मिळणार आहे . ‘आ वै जा सा ‘ म्हणजे आध्यात्मिक,वैज्ञानिक ,जात्यातीथ आणि सामाजिक होय. हा चित्रपट नवीन पिढीच्या सर्वांगीण विकास आणि प्रगतीशी संबंधित आहे . सध्याच्या काळात मुलांची आध्यात्मिक ,सामाजिक, सांस्कृतिक आणि सर्व समावेशक प्रगती होण्याची खरी गरज आहे आणि तोच विषय या चित्रपटातून अतिशय योग्य प्रकारे आणि मनापासून मांडला गेला आहे .
‘आ वै जा सा ‘ चित्रपट माहितीपूर्ण ,शैक्षणिक आणि मनोरंजन करणारा ठरावा यासाठी चित्रपटाचा प्रत्येक घटक प्रयत्नशील राहिला आहे . या चित्रपटात महाराष्ट्र ,गोवा ,कर्नाटक आणि केरळ येथील कलावंत आहेत. चित्रपटातील संवाद अर्थातच कोकणी भाषेतील असतील. कुमारी गौरीका राव या नवोदित बालअभिनेत्रीने छोटी पण अतिशय महत्वाची भूमिका चित्रपटात केली आहे. हा चित्रपट धमाल आणि मनोरंजन याने परिपूर्ण आहे. मुलांना सशक्त आणि सक्षम बनवणे, त्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावणे ,त्यांना या देशाचे परिपूर्ण, आत्मविश्वासू आणि प्रामाणिक नागरिक बनवणे यासाठी ‘आ वै जा सा ‘ खूप महत्वाचा ठरणार आहे. पारंपरिक गिंडी नृत्य, यक्षगान ,पपेट्री अशा सांस्कृतिक कलांना या चित्रपटात उत्तमपणे चित्रित केले गेले आहे. बाल कलावंतामध्ये सार्थक शेणॉय ,श्रेयस कामत ,समर्थ शेणॉय आणि स्पंदना पै यांचा समावेश आहे. ‘आ वै जा सा ‘ चित्रपट प्रसिद्ध कोकणी चित्रपट दिग्दर्शक डॉकटर के. रमेश कामत यांनी दिगदर्शित केला आहे .
या चित्रपटाचे चित्रीकरण कर्नाटकच्या सुंदर किनारपट्टीवर करण्यात आले आहे. २ जुलै २०१६ रोजी या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमिअर ‘नाका ‘ यांनी आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय कोकणी परिषद २०१६ मध्ये संपन्न होत आहे. हा सोहळा अटलॅण्टा, जॉर्जिया, अमेरिका येथे होईल.
डॉकटर रमेश कामत हे मूळचे बंगलोर येथील असून ते पुणे येथील प्रसिद्ध एफ टी आय संस्थेचे पदवीधर आहेत . १९८० साली त्यांनी पहिल्या सारस्वत कोकणी चित्रपटाचे दिगदर्शन आणि निर्मिती केली होती. चित्रपटाचे नाव होते ‘जन मान’ बंगलोर येथील जवाहरलाल नेहरू प्ल्यानेटोरियम चे ते माजी संचालक होते . त्यांनी अनेक कोकणी पुस्तकांचे लेखन केले असून ‘भारत पुराचो भारत मस्तर ‘ हे त्यांचे पुस्तक खूप लोकप्रिय झाले होते. हे पुस्तक केरळ कोकणी अकादमी ने प्रकाशित केले होते .
संग्रहित लेख, दिनांक 28th Jun 2016 रोजी प्रकाशित
कोकणी भाषेतील पहिलावहिला बालचित्रपट ‘आ वै जा सा ‘
हा सोहळा अटलॅण्टा, जॉर्जिया, अमेरिका येथे होईल.
Written by लोकसत्ता टीमguravchaitali

First published on: 28-06-2016 at 10:38 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: First kokani movie for childrens