‘हृदयांतर’ या चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर चित्रपट दिग्दर्शक विक्रम फडणीस लवकरच त्यांचा आगामी ‘स्माइल प्लीज’ हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेच. काही दिवसांपूर्वीच बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनच्या हस्ते या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा करण्यात आला. या चित्रपटामध्ये अभिनेत्री मुक्ता बर्वे, ललित प्रभाकर यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटासाठी कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी शुभेच्छा दिल्या असून अभिनेता रितेश देशमुखनेदेखील ट्विटरच्या माध्यमातून चित्रपटाच्या टीमला विशेष शुभेच्छा दिल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काही दिवसांपूर्वी रितेशने सोशल मीडियावर या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित केलं. या पोस्टरमध्ये अभिनेता ललित प्रभाकर आणि मुक्ता बर्वे एक स्मितहास्य करताना दिसत आहे. आयुष्यातील हसण्याचे क्षण अधोरेखित करणारे हे पोस्टर निश्चितच डोळ्यांना सुखावणारे आहे.

प्रत्येकाच्या आयुष्यात चढउतार हे येतच असतात, परंतु त्याकडे सकारात्मकतेने बघून, जीवनाची पुनर्मांडणी करण्यास शिकवणारा ‘स्माइल प्लीज’ हा चित्रपट येत्या १९ जुलै रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे, असं रितेशने पोस्ट शेअर करत म्हटलं आहे.

दरम्यान, या चित्रपटात प्रसाद ओक, अदिती गोवित्रीकर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत, सनशाईन स्टुडिओच्या सहयोगाने, हॅशटॅग फिल्म स्टुडिओ आणि क्रित्यावत प्रॉडक्शन निर्मित ‘स्माइल प्लीज’ हा चित्रपट प्रेक्षकांनाही जगण्याची नवीन उमेद देऊन, चेहऱ्यावर नक्कीच स्माइल आणेल.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: First look of smile please riteish deshmukh share photo ssj
First published on: 11-06-2019 at 11:33 IST