scorecardresearch

फ्लॅशबॅक : गोष्ट एका वादळाची

रेखाने सेटवर पाऊल टाकले तेच विश्वजीतचे हलकेसे चुंबन घेत…

rekha

फिल्मी गॉसिप्सचा इतिहास पुस्तक रुपाने प्रसिध्द करताना त्यात रेखासाठी बरीच पाने खर्च करावी लागतील हे काही वेगळे सांगायला हवे का? पण त्यातले पहिले प्रकरण कोणते माहित्येय? ‘सावन भोदो’तील गाँव की छोरी साकारतानाचा तिचा आक्रमकपणा ‘फार झणझणीत’ अशी प्रतिक्रिया गाजली आणि रेखा दीर्घकाळ हिंदी चित्रपटसृष्टीवर राज्य करणार याची चाहूल लागली. पण बहुधा सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीची रेखा एवढ्यावर थांबणारी नसावी. गॉसिप्स पत्रकारितेला तेव्हा नुकतेच चांगले दिवस आले होते. काही तरी चमचमीत घडण्याची वाट पाहिली जात होती अथवा जरा काही वाकडे घडले असे वाटले तरी त्याला सनसनाटी रंग दिला जात होता. अशा वातावरणात ‘मेहमान’ नावाच्या चित्रपटाच्या सेटवर अचानक एक घटना घडली. रेखाने सेटवर पाऊल टाकले तेच विश्वजीतचे हलकेसे चुंबन घेत… तोपर्यंन्त चित्रपटसृष्टीत फार असे मोकळे वातावरण होते की नव्हते याचा विचार करण्यापेक्षा ही धिटाई मानली गेली आणि ‘कुचाळक्यां’मध्ये प्रचंड रस असणाऱ्या अशा काही गॉसिप्स मॅगझिन्सने हे अक्षरश: गाजवले. तेथून ते भाषिक पत्रकारितेत पोहचले. रेखाभोवती वादळी अशी प्रतिमा आकाराला येण्यासाठी यापेक्षा आणखी काय घडायला हवे होते हो? खरं तर ‘अंजाना सफर’ या नावाने हा चित्रपट निर्माण होत होता. पण रखडत पूर्ण झाल्याने तो ‘मेहमान’ नावाने प्रदर्शित होईपर्यन्त रेखा आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जात होती. (या चित्रपटाद्वारे गुलशन या चित्रपटगृहाचे उद्घाटन झाले) विश्वजीतसोबत ‘कहते हैं मुझको राजा’मध्ये भूमिका साकारत रेखाने त्याला सहकार्य केले हो. कारण त्याचा तो निर्माता-दिग्दर्शक होता.
दिलीप ठाकूर

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-02-2016 at 01:05 IST

संबंधित बातम्या