‘फोर्ब्स इंडिया’नं २०१८ मधल्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या श्रीमंत सेलिब्रिटींची यादी जाहीर केली आहे. या यादीत बॉलिवूडच्या भाईजाननं कॅप्टन विराट कोहलीला मागे टाकत अव्वल स्थान मिळवलं आहे. सलमाननं २५३. २५ कोटींची कमाई केली आहे. ‘रेस ३’, ‘टायगर झिंदा है’ विविध टीव्ही शो, जाहिरातीतून आलेल्या कामाईचा हा एकूण आकडा आहे. २०१८ मध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीच दुसऱ्या क्रमांकावर विराट कोहली आहे. या वर्षातली विराटची एकूण कमाई ही २२८.०९ कोटी आहे.

तिसऱ्या स्थानावर बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आहे. अक्षयनं या वर्षभारत एकूण १८५ कोटींची कमाई केली आहे. तर पाचव्या स्थानावर भारतीय क्रिकेट टीमचा माझी कॅप्टन महेंद्र सिंग धोनीचा समावेश आहे. धोनीची या वर्षभरातील एकूण कमाई ही १०१. ७७ कोटी आहे. सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप ५ सेलिब्रिटींच्या यादीत केवळ एकच महिला आहे. ती म्हणजे अभिनेत्री दीपिका पादुकोन होय. या यादीत ती चौथ्या क्रमांकावर आहे. ‘फोर्ब्स’नं जाहीर केलेल्या यादीत दाक्षिणात्य कलाकारांचाही समावेश आहे. यावर्षी आघाडीच्या १०० सेलिब्रिटींच्या यादीत अनेक दाक्षिणात्य कलाकारांनी आपलं स्थान मिळवलं आहे. यात नयनतारा ही एकमेव अभिनेत्री आहे.