९६ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
‘वस्त्रहरण‘ या गाजलेल्या नाटकाचे लेखन गवाणकर यांनी केले आहे.  ‘वस्त्रहरण’नंतर गवाणकरांनी मोजकी, पण दर्जेदार नाटकं लिहिली. त्यामध्ये ‘दोघी’, ‘वन रूम किचन’ यांसारख्या नाटकांचा समावेश आहे. मालवणी भाषेला रंगमंचावर आणण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. याआधी बेळगाव येथे झालेल्या ९५ व्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद फैयाज शेख यांनी भूषविले होते.