लेखक, दिग्दर्शक प्रविण विठ्ठल तरडे यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत चित्रपट म्हणजे ‘सरसेनापती हंबीरराव.’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा करताच चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळाली होती. आता या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला असून सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रविण विठ्ठल तरडे यांची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन असलेल्या ‘सरसेनापती हंबीरराव’ मध्ये कोणते कलाकार, कोणती ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारणार? याबद्दल प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता होती. शिवजयंतीच्या मुहूर्तावर यातील एका महत्वपूर्ण व्यक्तिरेखेचा उलगडा झाला. मराठी चित्रपटसृष्टीतील हॅंड्सम हंक अभिनेता गश्मीर महाजनी ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार असल्याचे स्पष्ट झाले होते. आता चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.

आणखी वाचा : अभिनेत्री यामी गौतम अडकली विवाहबंधनात

अभिनेत्री श्रुती मराठेने सरसेनापती हंबीरराव चित्रपटाचा टीझर इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. हा टीझर शेअर करत तिने चित्रपट चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले आहे. “सरसेनापती हंबीरराव हा केवळ एक चित्रपट नाही, तर आपल्या दोन्ही छत्रपतींशी निगडीत एक पवित्र भावना आहे. असे कितीही लॅाकडाउन आले तरी ही भावना व्यक्त होणार चित्रपटगृहातच.. लवकरच.. पण त्या आधी आजच्या या पवित्र पावन दिवशी तुमच्या आमच्या महाराजांचे हे सिंहासनाधिश्वर दर्शन!” या आशयाचे कॅप्शन तिने टीझर शेअर करत दिले आहे. श्रुती मराठेने चित्रपटाचा टीझर शेअर केल्यामुळे ती चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार असल्याचे म्हटले जात आहे. पण अद्याप याबाबत कोणीतीही माहिती समोर आलेली नाही.

प्रविण विठ्ठल तरडे यांच्या ‘मुळशी पॅटर्न’ या संवेदनशील, सामाजिक चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकत बॉक्सऑफिसवर दणदणीत यश संपादन केले. यामुळे प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढचा चित्रपट कोणता? याबद्दल रसिकांच्या मानत उत्सुकता होती, तरडे यांनी ‘सरसेनापती हंबीरराव’ या ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा केल्यापासून महाराष्ट्रासह जगभरातील चाहते या ऐतिहासिक चित्रपटाची मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gashmir mahajani role chhatrapati shivaji maharaj pravin tarde sarsenapati hambirrao teaser avb
First published on: 06-06-2021 at 11:49 IST