गौहर खानच्या लग्नाची धूम; ‘चिक्सा’नंतर केला जबरदस्त डान्स

कोरिओग्राफर आणि डान्सर झैद दरबारशी ती लग्न करणार आहे.

‘बिग बॉस’ची विजेती आणि प्रसिद्ध अभिनेत्री गौहर खानच्या घरी लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. कोरिओग्राफर आणि डान्सर झैद दरबारशी ती लग्न करणार आहे. २५ डिसेंबर रोजी विवाहसोहळा पार पडणार असून लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. निकाहच्या आधी सोमवारी चिक्साची विधी करण्यात आली. यानंतर गौहर आणि झैद यांच्यासोबत दोन्ही कुटुंबीयांनी जबरदस्त डान्स केला. सोशल मीडियावर या सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

वधू आणि वराच्या नावातील काही अक्षरांना जोडून दोघांना एक टोपणनाव देण्याचा सध्या ट्रेण्ड आहे. तसंच गौहर आणि झैदला ‘गाझा’ असं नाव देत सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करण्यात आले. चिक्साच्या विधीसाठी गौहर आणि झैदने पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. गौहरने पिवळ्या रंगाचा लेहंगा तर झैदने पिवळा कुर्ता परिधान केला होता. गौहरनेही तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर झैदसोबतचे फोटो पोस्ट केले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

 

View this post on Instagram

 

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

 

View this post on Instagram

 

A post shared by GAUAHAR KHAN (@gauaharkhan)

Video : जिंदगी का सफर! पाहा, कार्तिकी-रोनितचा लग्नसोहळा

झैद हा प्रसिद्ध संगीतकार इस्माइल दरबार यांचा मुलग आहे. वडिलांप्रमाणे संगीत क्षेत्रात करिअर न करता झैदने वेगळी वाट निवडली. डान्सर आणि कोरिओग्राफर म्हणून त्याची इंडस्ट्रीत ओळख आहे. सोशल मीडियावर झैदचे अनेक फॉलोअर्स असून तो आधी टिकटॉक स्टार होता. झैद आणि गौहर यांच्या वयात १२ वर्षांचं अंतर आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Gauhar khan and zaid darbar pre wedding rituals begin watch gauhar dance videos ssv

Next Story
नाट्यरंग : ‘चित्रगोष्टी’ : चित्रं अन् जगण्याचं अन्योन्य नातं!
ताज्या बातम्या