‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील जयदीप-गौरी पुन्हा अडकणार लग्नाच्या बेडीत

संपूर्ण शिर्केपाटील कुटुंब या लग्नाच्या निमित्ताने हटके अंदाजात दिसणार आहे.

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’या मालिकेने महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. जयदीप आणि गौरीची जोडी प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीला उतर असल्याचे दिसत आहे. सध्या मालिका एका वेगळ्या वळणावर पोहोचली आहे. मालिकेत जयदीप आणि गौरीच्या लग्नाचा थाट पाहायला मिळणार आहे. माई आणि दादांच्या इच्छेखातर पुन्हा एकदा लग्नाचा घाट घालण्यात आला आहे.

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत शिर्केपाटील कुटुंबात एखादा सणसमारंभ असो वा कोणतंही शुभकार्य ते थाटातच पार पडतं. त्यामुळे जयदीप-गौरीचं लग्न देखिल अगदी थाटात पार पडणार आहे. प्री वेडिंग फोटोशूटपासून, मेहंदी, हळद, वरात आणि लग्नाचा शाही थाट पाहायला मिळेल. लग्नात जयदीप गौरीचा लूक नेमके कसा असणार याची उत्सुकता आहे.
आणखी वाचा : ‘भल्या भल्या कलाकारांची शिट्टी वाजणार’, एक धमाकेदार कुकरी शो लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

प्री वेडिंग फोटोशूटसाठी जयदीप-गौरीसह संपूर्ण शिर्केपाटील कुटुंबाने रेट्रो लूकला पसंती दिली आहे. जयदीप-गौरी काशिनाथ घाणेकर आणि आशा काळे यांच्या रुपात दिसणार आहेत. तर उदय आणि देवकी दिसतील दादा कोंडके आणि उषा चव्हाण यांच्या रुपात. शेखर-रेणुकेने अशोक सराफ आणि रंजना यांच्यासारखा लूक केलाय तर मल्हार बनलाय दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे. माई आणि दादा यांनी सुद्धा ७०च्या दशकातला लूक केला आहे. तर अम्मा दिसणार आहे ललिता पवार यांच्या रुपात. संपूर्ण शिर्केपाटील कुटुंब या लग्नाच्या निमित्ताने हटके अंदाजात दिसणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Gauri jaydeep sukh mhanje nakki kay ast serial update avb

ताज्या बातम्या