बॉलिवूडचा पहिला सुपरस्टार राजेश खन्ना यांचा पुतळा शनिवारी वांद्रे येथील बॅंडस्टॅंड परिसरात युटीव्हीच्या ‘वॉक ऑफ द स्टार्स’मध्ये बसवण्यात आला. त्या निमित्ताने येथील कार्टर रोडला राजेश खन्ना यांचे नाव देण्यात यावे, अशी इच्छा राजेश खन्ना यांची पत्नी डिंपल कपाडिया यांनी व्यक्त केली.
या वेळी डिंपल कपाडिया, खन्ना यांची मुलगी ट्विंकल आणि जावई अक्षय कुमार यांच्यासह कॉंग्रेसचे खासदार राजीव शुक्ला, हेमा मालिनी, ऋषी कपूर, जितेंद्र, रणधीर कपूर, राकेश रोशन, मिथुन चक्रवर्ती, अंजू महेंद्रू, अमर सिंग आदी मान्यवर उपस्थित होते. राजेश खन्ना हे केवळ कलाकार नव्हते तर कॉंग्रेस पक्षाचे खासदारही होते, याची आठवण करून देत डिंपल कपाडिया यांनी कार्टर रोड राजेश खन्ना यांच्या नावाने ओळखला जावा यासाठी प्रयत्न करण्याची विनंती खासदार राजीव शुक्ला यांना केली. डिंपल यांची विनंती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण त्यांच्या कानावर घालण्याचे आश्वासन शुक्ला यांनी दिले.
संग्रहित लेख, दिनांक 11th Aug 2013 रोजी प्रकाशित
कार्टर रोडला राजेश खन्ना यांचे नाव द्या – डिंपल
बॉलिवूडचा पहिला सुपरस्टार राजेश खन्ना यांचा पुतळा शनिवारी वांद्रे येथील बॅंडस्टॅंड परिसरात युटीव्हीच्या ‘वॉक ऑफ द स्टार्स’मध्ये बसवण्यात आला.
First published on: 11-08-2013 at 06:31 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Give name of rajesh khanna to carter road dimpal