गो करोना गो…उत्कर्ष शिंदेंचं नवीन गाणं

या गाण्यातून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे.

utkarsh shinde
उत्कर्ष शिंदे

गो करोना… या दोन शब्दांमुळे रामदास आठवले हे पुन्हा चर्चेचा विषय ठरले. मात्र त्यांच्या याच दोन शब्दांवरून उत्कर्ष शिंदे यांनी गो-करोना, करोना गो हे गीत गायलं आहे. हे गीत शनिवारी संध्याकाळी प्रदर्शित करण्यात येणार आहे. तेजस चव्हाण यांनी हे गीत संगीतबद्ध केलं असून त्यांनीच याचे बोल लिहिले आहेत. करोनामुळे नागरिकांमध्ये अनेक गैरसमज आहेत. ते या गीतामधून दूर करण्याचा प्रयत्न केला असून काळजी कशी घ्यायची ते हसत खेळत सांगण्यात आले आहे.

करोना विषाणूबद्दल लोकांमध्ये असलेले गैरसमज दूर केले पाहिजेत असं तेजस चव्हाण यांना वाटलं. तेव्हा, रामदास आठवले यांचे गो करोना, करोना गो हे शब्द आठवले आणि तेजस यांनी या शब्दांवरून गीत साकारलं. अत्यंत सोप्या भाषेचा वापर करत हे गाणं लिहिलं गेलंय.

करोनाबद्दल खूप गैरसमज समाजात आहेत. भीती न बाळगता सर्व गोष्टी नीट समजून घ्यायला पाहिजे. काळजी काय घ्यावी हे समजून घ्यावं. या गाण्यातून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. यातून कमावण्याचा काही हेतू नाही. फक्त लोकांमधील भीती दूर व्हावी आणि गैरसमज निघून जावे यासाठी हे गाणं आहे, असं उत्कर्ष शिंदे म्हणाले.

उत्कर्ष शिंदे हे स्वत: डॉक्टर आहेत. अनेक रुग्णांमध्ये त्यांनी करोनाची दहशत पाहिली आहे. त्यामुळे घाबरून जाऊ नका आणि याविषयी सर्व माहिती नीट समजून घ्या, असा संदेश त्यांनी दिला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Go corona go marathi singer utkarsh shinde new song on corona virus kjp 91 ssv

ताज्या बातम्या