२००४ मध्ये आलेला प्रसिद्ध चित्रपट ‘मस्ती’चा सिक्वल ‘ग्रॅण्ड मस्ती’ च्या निर्मात्यांनी या प्रौढांसाठीच्या विनोदी चित्रपटावर आधारित पुस्तक प्रकाशनासाठी एका प्रकाशन संस्थेशी करार केला आहे.
आंतरराष्ट्रीय प्रकाशन संस्था ‘हर्लेक्वीन इंडिया’ला चित्रपटाच्या व्यक्तिरेखांचे अधिकार देण्यात आले आहेत. असे पहिल्यांदाच होत असून, ‘ग्रॅण्ड मस्ती : द फन नेव्हर एण्डस्’ या पुस्तकात अमर (रितेश देशमुख), मीत (विवेक ओबराय) आणि प्रेम (आफताब शिवदासानी) यांनी मोठ्या पडद्यावर साकारलेल्या मस्ती आणि खोड्यांचा पुस्तकात समावेश करण्यात येणार आहे.