बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरच्या चाहत्यांना कदाचित ही बातमी आवडणार नाही कारण ही बातमी आहे अर्जुन कपूरच्या बेजबाबदारपणाची. होय, ‘हाफ गर्लफ्रेण्ड’ सिनेमाच्या सेटवर अर्जुनच्या बेजबाबदार वागण्यामुळे ‘हाफ गर्लफ्रेण्ड’चा दिग्दर्शक मोहित सुरी यांच्या नाकीनऊ आले आहेत. त्याच्या या बेजबाबदार वागण्यामुळे या दोघांमध्ये वाद झाल्याचेही कळते.
‘हाफ गर्लफ्रेण्ड’च्या पहिल्या शेड्युलचे शुटींग दिल्लीत नुकतेच पार पडले. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील याच शुटींग दरम्यान अर्जुनच्या रोजच्या पार्ट्या आणि कामात त्याचा होणारा परिणाम यामुळे भरपूर रिटेक्स व्हायचे. त्याच्या याच रिटेक्समुळे मोहित जाम वैतागला. केवळ अर्जुनच्या सेटवर उशीरा येण्याची बाब असतील तर कदाचित मोहितने त्याकडे दुर्लक्षही केले असते. पण गोष्ट अर्जुनच्या सादरीकरणाची होती. तो अपेक्षेप्रमाणे सादरीकरण करत नसल्यामुळे त्याचा त्रास इतरांना होत होता. यामुळे मोहितचा पारा चढला आणि त्याने अर्जुनला चांगलेच सुनावले. शुटिंग संपले की अर्जुन पंचतारांकित हॉटेलमध्ये पार्टी कायला जायचा. या त्याच्या पार्ट्या रात्री उशिरापर्यंत चालायच्या. एका पार्टीचा खर्च जवळपास १ लाख रुपये यायचा. शिवाय पार्टीला उशिर झाल्यामुळे तो दुसऱ्या दिवशी सकाळी उशिरा उठायचा.
सुरुवातीला मोहित सुरीने त्याकडे दुर्लक्ष केले. पण त्याचे हे नित्याचेच व्हायला लागल्यानंतर मात्र मोहितने त्याला सुनावले. त्यांच्यातली ही बाचाबाची वादापर्यंत गेली. शुटिंगचे पहिले सत्र संपले असले तरी दुसऱ्या सत्रात हा वाद त्यांच्यात कायम राहणार की समेट होईल हे येणारा काळच ठरवेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘हाफ गर्लफ्रेण्ड’ या सिनेमाची  मुळ संकल्पना चेतन भगत याची आहे. श्रद्धाने ट्विटरवरुन या सिनेमाच्या प्रदर्शनाची घोषणा केली होती. एखाद्या पुस्तकावर सिनेमा साकारण्याची ही पहिलीच घटना नाही. अर्जुन कपूरने या आधीही ‘२ स्टेट्स’ सिनेमात आलिया भट्ट बरोबर काम केले होते. चेतन भगतच्या ‘२ स्टेट्सः द स्टोरी ऑफ माय मॅरेज’ या पुस्तकावर आधारित हा सिनेमा होता.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Half girlfriend director mohit suri messed up with arjun kapoor for his 1 lakh per day parties and retakes
First published on: 30-08-2016 at 19:53 IST