माजी विश्व सुंदरी आणि बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय आज (१ नोव्हेंबर) ४१वा वाढदिवस साजरा करत आहे. बॉलिवुडच नव्हे हॉलिवुडमधील दिग्गजांवर आपल्या सौदर्याची मोहिनी घालणारी अभिनेत्री ऐश्वर्या रायचा आज वाढदिवस. बॉलिवुडमध्ये विवाह तसेच मातृत्वानंतर अभिनेत्रीने स्वत:चे स्थान टिकवून ठेवल्याची उदहारणे फार कमी आहेत. ऐश्वर्या राय याला अपवाद आहे. मातृत्वानंतरही ऐश्वर्याच्या सौदर्यात तूसभरही फरक पडलेला नाही. आजही लाखो चाहते तिच्या सौदर्याने घायाळ होतात.
फोटो गॅलरीः सोनेरी मत्स्यकन्या
मिस इंडिया, मिस वर्ल्ड ते पद्मश्री किंवा कर्नाटक ते मुंबई किंवा तमीळ चित्रपट ते हॉलीवूड असा तिचा कितीही मोठ्या प्रवासाचा विचार करता येईल. पण या सगळ्या प्रवासात सतत समोर दिसतो तो तिचा कामातला प्रामाणिकपणा, उत्साह, जिद्द आणि निरागसता. ‘आखोंकी गुस्ताकिया माफ हो’ गाण्यातून सौंदर्याचीही व्याख्या बदलायला लावणारी ऐश्वर्या तीच्या छोट्आ एंजल बाबतीत मात्र तितक्याच निरागसतेनं बोलते.
आपणही ऐश्वर्याला तिच्या वाढदिवसानिमित्त खालील प्रतिक्रिया बॉक्समध्ये शुभेच्छा येथे देऊ शकता..
फोटो गॅलरीःऐश्वर्या राय बच्चनचा १३ वर्षांचा ‘कान’ प्रवास
फोटो गॅलरीः सौंदर्यवती ऐश्वर्या राय बच्चन
फोटो गॅलरीः रूपाचे ऐश्वर्य!
फोटो गॅलरीः कान फेस्टिवल २०१४: ऐश्वर्याची पहिली झलक
संग्रहित लेख, दिनांक 1st Nov 2014 रोजी प्रकाशित
‘हॅप्पी बर्थ डे ऐश्वर्या’
माजी विश्व सुंदरी आणि बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय आज (१ नोव्हेंबर) ४१वा वाढदिवस साजरा करत आहे.

First published on: 01-11-2014 at 12:52 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Happy birthday aishwarya rai bachchan