बॉलिवूडचा नवाब सैफ अली खान पडद्यावर गंभीर भूमिका साकारत असो किंवा विनोदी, प्रेक्षकांमध्ये एक वेगळीच छाप नेहमीच सोडून जातो. सैफचा आज ४७ वा वाढदिवस. २०१२ मध्ये त्याने आपल्यापेक्षा दहा वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्री करिना कपूरशी लग्न केलं. सैफ आणि करिनाची जोडी बॉलिवूडच्या सुपरहिट जोड्यांपैकी एक आहे. दोघांची प्रेमकथाही तितकीच रंजक आहे.

‘टशन’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर ‘कुरबान’ चित्रपटातही दोघांमधील रोमॅण्टिक केमिस्ट्री पाहायला मिळाली. एका मुलाखतीदरम्यान सैफला जोडीदार म्हणून निवडण्याचं कारण करिनाने स्पष्ट केलं होतं. ती म्हणाली की, ‘मला स्वावलंबी राहणं जास्त आवडतं. लग्नानंतरही मला चित्रपटात काम करायचं आहे. पत्नी किंवा आई झाल्यानंतरही माझ्या करिअरवर त्या गोष्टींचा कोणताच परिणाम झाला नाही पाहिजे असं मला वाटतं.’

https://www.instagram.com/p/BXN3pHYFmxq/

PHOTOS : बॉलिवूडच्या स्टायलिश बहिणींची जोडी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लग्नापूर्वी करिनाने सैफसमोर एक अट ठेवली. या अटीसंदर्भात ती पुढे म्हणाली की, ‘मला आयुष्यभर पैसे कमवायचे आहेत. लग्नानंतरही चित्रपटसृष्टीत करिअर करणार असल्याची अट मी सैफसमोर ठेवली. या गोष्टीला त्याचा नकार नव्हता, म्हणून मी लग्नासाठी तयार झाले.’
अटीप्रमाणेच करिना लग्नानंतरही बॉलिवूडमध्ये सक्रीय आहे. लवकरच ती ‘वीरे दी वेडिंग’ चित्रपटात सोनम कपूर आणि स्वरा भास्करसोबत झळकणार आहे. तर सैफ सध्या ‘बाजार’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे.