दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार आणि अनेक तरुणींच्या गळ्यातलं ताईत म्हणजे अभिनेता विजय देवरकोंडा. केवळ टॉलिवूडचं नाही, तर बॉलिवूडमध्येही त्याची प्रसिद्धी आणि लोकप्रियता कमी नाही. ‘अर्जुन रेड्डी’ या चित्रपटातील त्याचा अभिनय तुफान गाजला. त्यामुळेच या चित्रपटाचा हिंदी रिमेकही करण्यात आला. ‘कबीर सिंग’ हा हिंदी रिमेकही तितकाच गाजला,मात्र ‘अर्जुन रेड्डी’ची जादू आजही प्रेक्षकांवर तितकीच आहे, त्यामुळे विजय आज लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. अनेकांच्या हृदयाची धडधड असलेल्या विजयला मात्र बॉलिवूडमधील दोन अभिनेत्री प्रचंड आवडतात. किंबहुना त्या त्याचं क्रश आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
विजयने ‘फिल्म कम्पॅनियन’ला एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीवेळी त्याच्यासोबत दीपिका पदुकोण, आलिया भट्ट, आयुषमान खुराना, रणवीर सिंग आणि मनोज वायपेयी हे कालाकार मंडळीही उपस्थित होती. यावेळी विजयने त्याला आवडणाऱ्या दोन बॉलिवूड अभिनेत्रींची नाव सांगितली.
“तुला आवडणारी अभिनेत्री कोणती?” किंवा “जर कधी एखाद्या वेळी कलाविश्वातील कोणत्याही व्यक्तींचा सल्ला घेण्याची वेळ आली तर कोणाचा सल्ला घेशील?” असा प्रश्न विजयला विचारण्यात आला. यावेळी त्याने क्षणाचाही विलंब न लावता दीपिका पदुकोण आणि आलिया भटचं नाव घेतलं. मात्र आता दीपिकाचं लग्न झालं आहे. त्यामुळे केवळ आलियाचं बाकी असल्याचं त्याने सांगितलं.
दरम्यान, ‘अर्जुन रेड्डी’आणि ‘डियर कॉमरेड’ या तेलुगू चित्रपटांनंतर अभिनेता विजय हा तरुणींच्या गळ्यातील ताईत झाला आहे. टॉलिवूडपासून बॉलिवूडचेही प्रेक्षक त्याच्या अभिनयाचे आणि स्टाइलचे दिवाने झाले आहेत. ‘डियर कॉमरेड’ या चित्रपटामध्ये त्याच्यासोबत अभिनेत्री रश्मिका मंदाना ही स्क्रीन शेअर केली आहे.