भारतीय क्रिकेट संघातील धडाडीचा खेळाडू हार्दिक पांड्या सध्या क्रिकेटपासून दूर आहे. दुखापतग्रस्त हार्दिक क्रिकेटपासून दूर असला, तरी सोशल मीडियावर मात्र प्रचंड सक्रिय आहे. नुकतेच हार्दिकने ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने प्रेयसी नताशा स्टॅन्कोविकसोबतचे काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले. नेटकऱ्यांनी मात्र या फोटोंवरुन हार्दिकची फिरकी घेतली आहे.
नेटकऱ्यांनी कशी उडवली हार्दिकची खिल्ली?
हार्दिकने प्रेयसीसोबत पोस्ट केलेल्या फोटोवर एका नेटकऱ्याने अय्यर बबीताची जोडी असं म्हटले आहे. अय्यर आणि बबीता ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या विनोदी मालिकेतील व्यक्तिरेखा आहेत. यातील अय्यर कृष्णवर्णीय आहे. तर बबीता गौरवर्णीय आहे. ही जोडी आपल्या अनोख्या विनोदी शैलीने ‘तारक मेहता’ मालिकेत अक्षरश: धम्माल उडवते. आणि यावरुन हार्दिकची सोशल मीडियावर फिरकी घेतली जात आहे.
नताशा स्टॅन्कोविक सर्बियन मॉडेल आहे. हार्दिकने काही महिन्यांपूर्वीच तिच्याशी साखरपुडा केला. त्याने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करुन आपल्या भविष्यकालीन पत्नीची माहिती चाहत्यांना दिली होती. यापूर्वी हार्दिक पांड्याचे नाव अभिनेत्री इशा गुप्ता, उर्वशी रौतेला आणि एली अवराम यांच्याशी देखील जोडले गेले होते.