अभिनेत्री सुष्मिता सेन ही तिच्या बॉलिवूड करिअरसोबतच खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदी यांनी सोशल मीडियावर सुष्मिता सेनसोबतच्या नात्याची कबुली दिल्यानंतर या दोघांच्या नात्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे. एवढंच नाही तर ते दोघे लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चाही रंगल्या आहेत. नुकतंच या संपूर्ण चर्चांवर सुष्मिता सेनचे वडील शुभीर सेन यांनी प्रतिक्रिया दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुष्मिता आणि ललित मोदी यांच्या नात्याबाबत २०१० मध्ये चर्चा रंगल्या होत्या. पण त्यावेळी दोघांनीही याबाबत मौन पाळणंच पसंत केलं. सुष्मिता सेनचे वडील शुभीर सेन हे निवृत्त हवाई दल अधिकारी आहेत. नुकतंच त्यांना सुष्मिता सेन आणि ललित मोदी यांच्याबद्दल विचारण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांनी ‘मला याबाबत काहीही माहिती नाही’, असे सांगितले आहे.

सुष्मिता सेन आणि ललित मोदींच्या रिलेशनशिपवर एक्स बॉयफ्रेंडची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला…

हिंदुस्तान टाइम्सने सुष्मिता सेनच्या वडिलांशी याबद्दल विचारणा केली. त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार ते म्हणाले, “मला याबद्दल काहीच माहिती नाही. मी सकाळीच माझ्या मुलीशी बोललो, पण ती मला याबद्दल काहीच बोलली नाही. तुम्ही मला याबद्दल सांगितल्यानंतरच मी ते ट्विट पाहिलं होते. त्यामुळे मी तुम्हाला त्याबद्दल काय प्रतिक्रिया द्यावी, हे मला कळत नाही.”

“मला याबद्दल नंतर नक्की कळेल. पण आता मला एवढंच सांगायचं आहे की मला अद्याप याबद्दल काहीही माहिती नाही. मला ललित मोदींबद्दल फार काही माहिती नाही. जर मला त्याबद्दल काही माहिती असते तर मी तुम्हाला नक्कीच सांगितले आहे. त्यात लपवण्यासारखे काहीही नाही”, असे शुभीर सेन म्हणाले.

ललित मोदी- सुष्मिता यांच्या नात्यावर भाऊ राजीव सेनची प्रतिक्रिया, म्हणाला…

“मी ललित मोदीला जावई म्हणून स्वीकारेन की नाही याचीही माहिती मी तुम्हाला त्याचवेळी देऊ शकेन. ज्यावेळी मला याबद्दल सर्व गोष्टी समजतील, त्यानंतर मी त्याचा स्वीकार करेन”, असेही सुष्मिता सेनच्या वडिलांनी सांगितले.

दरम्यान उद्योजक ललित मोदी यांनी सुष्मितासोबतचे काही फोटो शेअर करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. “कुटुंबासोबत मालदीव, सार्दानियाच्या दौऱ्यावरुन नुकताच लंडनला परतलो. यावेळी माझी ‘बेटर हाफ’ सुश्मिता सेनही सोबत होती. अखेर नवी सुरुवात आणि नवं आयुष्य सुरू झालं आहे. माझ्या आनंदाला पारावार उरलेला नाही,” असं ट्वीट मोदी यांनी केलं होतं. या ट्वीटसोबत त्यांनी सुष्मिता सेनसोबतचे काही फोटो शेअर केले होते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Have not heard anything about him said sushmita sen father shubeer sen reacted to her relationship with lalit modi nrp
First published on: 16-07-2022 at 11:54 IST