सुहानाबद्दलच्या या गोष्टी माहितीयेत का?

खेळाडू, नृत्यांगना, लेखिका… ही आहे तिची ओळख

suhana khan
सुहाना खान

अभिनेता शाहरुख खानच्या मुलीच्या म्हणजेच सुहानाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सोशल मीडियावरुन अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्या. बॉलिवूडच्या सेलिब्रिटी किड्समध्ये सुहानाचं नाव बऱ्याचदा चर्चेत असतं. विविध कार्यक्रमांना तिची उपस्थिती आणि कॅमेऱ्यासमोरील तिचा वावर नेहमीच अनेकांना प्रभावित करतो. सुहाना सध्या तरी सोशल मीडिया अकाऊंटवर फारशी सक्रिय नसून, ती शिक्षणावर लक्ष केंद्रित करत आहे.

सुहाना लंडनमधील एका प्रतिष्ठीत विद्यालयात शिक्षण घेत असून, तिनं १७ वा वाढदिवसही तिथेच साजरा केला. शाहरुखच्या मुलीबद्दल जाणून घेण्यासाठी बऱ्याचदा अनेकजण सोशल मीडियाचा आधार घेतात, याचकरता एका वेबसाइटने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार सुहानाबद्दलच्या काही माहित नसलेल्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत.

सुहाना खिलाडू वृत्तीची आहे-
सुहानाने मैदानी खेळांमध्येही सहभागी व्हावं अशी किंग खान आणि गौरी खानची इच्छा होती. सुहानानेही तिच्या पालकांना निराश केलं नाहीये. ती एक फुटबॉलपटू आहे. याशिवाय तिला क्रिकेटमध्येही बरीच आवड असून, तिची ही आवड आयपीएल सामन्यांदरम्यान पाहायला मिळाली आहे. शाहरुखसोबत सुहानाने बऱ्याच क्रिकेट सामन्यांना आजवर हजेरी लावली आहे.
suhana

नृत्यकलेतही पारंगत आहे सुहाना –
सुहाना नृत्यकलेतही पारंगत असून, तिने नृत्यदिग्दर्शक शामक दावरकडून नृत्यकलेचं रितसर प्रशिक्षण घेतलं आहे. सोशल मीडियावरही शामक दावरच्या ‘समर डान्स फंक शो’मधील व्हिडिओ पोस्ट करण्यात आले आहेत.
1450875314suhana-2

झिआन मलिकची चाहती आहे सुहाना –
पॉप संगीतकलेमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध असणाऱ्या झिआन मलिक या गायकाच्या लाखो चाहत्यांमध्ये सुहानाचाही समावेश आहे. त्यामुळे शाहरुखची ही मुलगी कोणा दुसऱ्या कलाकाराचीच ‘फॅनगर्ल’ आहे असं म्हणायला हरकत नाही. काही दिवसांपूर्वीच एका कार्यक्रमाच्या निमित्ताने शाहरुखने झिआनसोबत सेल्फी काढला होता.
shahrukh-khan-and-zayn-malik

सुहानाचं शैक्षणिक आयुष्य-
सध्या सुहाना लंडनमध्ये उच्चशिक्षणासाठी गेली आहे. पण, याआधी तिने धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केलं होतं. फुटबॉलर, नृत्यांगना यासोबतच ती एक चांगली लेखिकासुद्धा आहे. राष्ट्रीय पातळीवर आयोजित करण्यात येणाऱ्या ‘कथा’ या स्पर्धेतही तिला पारितोषिक मिळालं होतं.
suhana-in-her-school-uniform-posing-with-friends-201509-594411

बॉलिवूड पदार्पणासाठी सुहाना सज्ज-
काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर सुहानाच्या शालेय कार्यक्रमादरम्यानचा एक व्हिडिओ चर्चेत आला होता. या व्हिडिओमध्ये तिच्या अभिनय कौशल्याची झलकही पाहायला मिळाली होती. त्यामुळे तिचे हे सर्व पैलू पाहता येत्या काळात सुहानासुद्धा बॉलिवूडमध्ये झळकू शकते अशा चर्चा रंगल्या आहेत.
suhana-srk-759

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Here are some lesser known facts about shah rukh khan daughter suhana as she turns

ताज्या बातम्या