Video: #BanLipstick का होतोय सोशल मीडियावर ट्रेंड ?

तेजस्विनी पंडित आणि सोनाली खरेचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

ban lips stcik, #BanLipstick, tejashwini pandi, sonali khare,

मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि अभिनेत्री सोनाली खरे या दोघीही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत त्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. नुकतंच या दोघींनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या त्यांचा हा व्हिडीओ प्रचंड चर्चेत आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी #BanLipstick असे म्हटलं आहे. त्यामुळे हा हॅशटॅग ट्रेंड होताना दिसत आहे.

तेजस्विनी पंडित आणि सोनाली खरे या दोघींनी इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला कॅप्शन देताना त्यांनी ‘माझा लिपस्टिकला विरोध आहे. बॅन लिपस्टिक!’ असे म्हटले आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

तेजस्विनी आणि सोनाली यांनी शेअर केलेल्या व्हिडीओ मागे त्यांचा नेमका काय हेतू आहे? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. एखाद्या आगामी चित्रपट आणि नाटकाच्या प्रमोशनसाठी त्या दोघीही लक्ष वेधून घेत असल्याचे म्हटले जात आहे. मात्र त्यांचा हा व्हिडीओ नेमका कशासाठी आहे याचा उलगडा अजून झालेला नाही. त्यांचा हा व्हिडीओ प्रमोशनचाच एक भाग असल्याचे म्हटले जात असले तरी त्या दोघी कोणत्या चित्रपटात किंवा नाटकात झळकणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे सध्या प्रेक्षक औत्सुक्याने यामागे नेमके काय कारण आहे? हे शोधताना दिसत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Here is a reason why ban lips stcik trending tejashwini pandi sonali khare avb

ताज्या बातम्या