अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा यांनी आता प्रसारमाध्यमांसमोर अधिकृतपणे नात्याला स्विकारलं आहे. आयुष्यात दुसऱ्यांदा संधी क्वचितच मिळते, असं म्हणत मलायकाने अर्जुनसोबतच्या नात्याला कबुली दिली होती. त्यानंतर आता ‘इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्न’मध्ये दोघांनी एकत्र हजेरी लावली. या कार्यक्रमात सूत्रसंचालन करत असलेल्या करण ठक्करने मलायकाची प्रशंसा केली. मात्र ‘पझेसिव्ह’ अर्जुन कपूरला हे फारसं रुचलं नाही. यावेळी मलायकाच्या बाजूलाच बसलेल्या अर्जुनने करणला हटके उत्तर देऊन त्याची बोलतीच बंद केली. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

”२० तास विमानाचा प्रवास करूनसुद्धा तू खूप सुंदर दिसत आहेस,” असं करण या व्हिडीओत मलायकाला म्हणताना दिसतो. तिच्याबाजूला बसायला मिळाल्यामुळे तू खूप नशीबवान आहेस असं तो अर्जुनला म्हणतो. हे ऐकताच अर्जुन त्याला म्हणतो, ”वो पीछे वाली के साथ फ्लर्ट कर ना (मागे बसलेल्या तरुणीसोबत फ्लर्ट कर ना)” अर्जुनचं हे उत्तर ऐकताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकतो.

https://www.instagram.com/p/B050Zd_B571/

आणखी वाचा : अशी सुरू झाली महाराष्ट्राचा जावई महेश बाबूची लव्हस्टोरी

अर्जुन आणि मलायका लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचीही जोरदार चर्चा होती. मात्र दोघांनीही या चर्चा खोट्या असल्याचं स्पष्ट केलं. अर्जुनच्या वाढदिवशी दोघंही परदेशात फिरायला गेले होते. अफेअरच्या चर्चांवर सुरुवातीला उत्तर देण्यास टाळाटाळ करणाऱ्या या दोघांनीही आता रिलेशनशिपमध्ये असल्याचं कबूल केलं आहे.