‘अनारकली ऑफ आरा’, ‘नील बट्टे सन्नाटा’ यांसारख्या चित्रपटांमधील आपल्या दमदार भूमिकांमुळे ओळखली जाणारी अभिनेत्री स्वरा भास्कर विविध विषयांवर नेहमीच बेधडक मतं मांडताना दिसते. रोजच्या जीवनातील घडामोडी असो किंवा एखादा धगधगता विषयी, सोशल मीडियावर स्वरा स्पष्टवक्तेपणाने तिची भूमिका मांडते. मात्र याच कारणासाठी बऱ्याचदा ती ट्रोलसुद्धा होते. गेल्या काही दिवसांपासून ट्विटरवर #SwaraMustResign हा हॅशटॅग जोरदार ट्रेण्ड होत आहे. आता नेटकरी स्वराला राजीनामा दे असं का म्हणत आहेत बरं, हा प्रश्न तुम्हालाही पडला ना? तर या हॅशटॅगवरून टोला जरी स्वराला लगावला असला तरी नेटकऱ्यांचा निशाणा मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे आहे.

#SwaraMustResign हा हॅशटॅग वापरून बरेच मीम्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामधील फोटोंमध्ये नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यावर स्वराचा मुखवटा एडीट करून वापरण्यात आला आहे. या मीम्सद्वारे अप्रत्यक्षपणे नरेंद्र मोदींना टोमणा मारण्यात आला आहे. यामागचं कारण म्हणजे बिहारमधील मुलींच्या वसतीगृहातील बलात्कार प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मौन. बिहारमधील मुझफ्फरपूर येथील मुलींच्या वसतीगृहात लहान मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जवळपास ३० मुलींवर बलात्कार करण्यात आला असून या घटनेने बिहारमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणावर मोदींनी अद्याप काहीच प्रतिक्रिया न दिल्याने नेटकऱ्यांनी स्वराच्या माध्यमातून मोदींना पंतप्रधान पदाचा राजीनामा देण्याची मागणी केली आहे.

https://twitter.com/amigo_comrade/status/1026153186589962241

https://twitter.com/bilal_motorwala/status/1026189974767656960