अभिनेता हृतिक रोशन मागच्या काही दिवसांपासून असं काही ना काही करताना दिसत आहे. ज्यामुळे त्याच्या आणि सबा आझादच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण येतं. कधी दोघंही लंच किंवा डिनरला जाताना दिसतात तर कधी एकमेकांच्या कुटुंबीयांसोबत टाइम स्पेंड करताना दिसतात. याशिवाय दोघंही सोशल मीडियावर एकमेकांच्या फोटो किंवा व्हिडीओवर कमेंट करताना दिसतात. आताही सबाच्या नव्या फोटोशूटवर हृतिकनं कमेंट केली आहे. ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

सबा आझादनं तिच्या इन्स्टाग्रामवर नव्या फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत. ज्याची सोशल मीडियावर चर्चा आहे. या फोटोमध्ये ती दिवंगत हॉलिवूड अभिनेत्री ऑड्रे हेपबर्न यांच्या वेशात दिसत आहे. त्यांच्यासारख्या लूकमध्ये सबानं केलेलं हे फोटोशूट बरंच व्हायरल झालं आहे आणि त्यावर बॉलिवूड सेलिब्रेटींनी देखील कमेंट केल्या आहेत. पण हृतिक रोशननं केलेली कमेंट सर्वाधिक चर्चेत आहे.

आणखी वाचा- “वरुणचं कॅरेक्टर…”, मधुरीमा रॉयसोबत अफेअरच्या चर्चांवर एक्स गर्लफ्रेंड दिव्या अग्रवालनं सोडलं मौन

मागच्या काही दिवसांपासून सबा आणि हृतिकच्या अफेअरच्या चर्चा सुरू झाल्यापासून हृतिक सातत्यानं सबाच्या फोटोंवर कमेंट करताना दिसतोय. आताही त्यानं सबाच्या फोटोवर कमेंट करताना लिहिलं, ‘टाइमलेस’ हृतिकची ही कमेंट सोशल मीडियावर बरीच चर्चेत आहे. एवढंच नाही तर हृतिक लवकरच सबासोबत लग्नाच्या बेडीत अडकेल असंही बोललं जात आहे.

आणखी वाचा- नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान याआधीही हृतिकनं सबासाठी सोशल मीडियावर पोस्ट केली होती. ज्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली होती. याशिवाय काही दिवसांपूर्वी आजारी असलेल्या सबासाठी हृतिकच्या कुटुंबीयांनी जेवण पाठवलं होतं. ज्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर करत त्यांचे आभार मानले होते.