बॉलीवूड कलाकारांच्या चाहत्यांचा त्यांच्या लाडक्या नटाला भेटण्यासाठी केलेल्या आटय़ापिटय़ाच्या कहाण्या बऱ्याच गाजतात. कधी कोणी आपल्या लाडक्या नटाचे नाव हातावर गोंदवतो, तर कोणी एखाद्या नटीच्या छायाचित्रांनी आपली अख्खी खोली रंगवून टाकतो. अमिताभ, शाहरुख यांच्या बंगल्याचे गेट एकदातरी उघडेल आणि त्यांचा चेहरा पाहायला मिळले, या आशेने दूर गावातून आलेल्या आणि बंगल्यांजवळ बसून राहणाऱ्यांची संख्याही कमी नसते. असाच काहीसा अनुभव हृतिक रोशनला दुबईत आला आहे.
हृतिक त्याच्या आगामी ‘बँग बँग’ चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी नुकताच अबुधाबीला गेला होता. कॉर्निश येथील मरिना मॉलजवळ एक अॅक्शन दृश्याचे चित्रिकरण करण्यासाठी हृतिक उपस्थित राहणार आहे हे कळल्यावर हृतिकच्या काही भारतीय चाहत्यांनी त्याची एक झलक पहायला मिळेल म्हणून तिथे कोण गर्दी केली होती. आपल्या लाडक्या नटाची एक झलक पाहण्यासाठी काही भारतीय कुटुंब भर उन्हात रस्त्यावर उभी होती. यात छोटय़ा मुलांचा समावेशही होता. दिवसाच्या अखेरीस ‘आपली सुट्टी सार्थ लागली’ ही भावना त्यांच्या चेहऱ्यावर होती. थोडक्यात चाहत्यांची महती महान असेच म्हणावे लागेल.
संग्रहित लेख, दिनांक 18th May 2014 रोजी प्रकाशित
हृतिकच्या एका झलकसाठी अबूधाबीकरांचा आटापिटा
बॉलीवूड कलाकारांच्या चाहत्यांचा त्यांच्या लाडक्या नटाला भेटण्यासाठी केलेल्या आटय़ापिटय़ाच्या कहाण्या बऱ्याच गाजतात. कधी कोणी आपल्या लाडक्या नटाचे नाव हातावर गोंदवतो, तर कोणी एखाद्या नटीच्या छायाचित्रांनी आपली अख्खी खोली रंगवून टाकतो.

First published on: 18-05-2014 at 01:07 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hrithik roshan on bang bang set in abu dhabi